12 इंचाचा 3K IPS डिस्प्ले, 16GB RAM! OnePlus Pad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत
OnePlus Pad Pro Saam TV
बिझनेस

12 इंचाचा 3K IPS डिस्प्ले, 16GB RAM! OnePlus Pad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत

साम टिव्ही ब्युरो

OnePlus ने आपल्या नवीन स्मार्टफोनसोबत आपला नवीन टॅबलेट OnePlus Pad Pro देखील लॉन्च केला आहे. नवीन टॅब मजबूत मेटल केससह येतो आणि हा टॅबलेट परवडणाऱ्या किमतीत जबरदस्त फीचर्स ऑफर करतो. फोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसरसह उत्तम कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले ग्राहकांना मिळणार. यातच याच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

टॅबमध्ये 7:5 Aspect Ratio सह 12.1-इंच 3K IPS डिस्प्ले पॅनेल, 540Hz टच सॅम्पलिंग रेट, 3000x2120 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 900 nits ब्राइटनेस, 144Hz रिफ्रेश रेटसह अनेक फीचर्स ग्राहकांना मिळणार. हा टॅब डॉल्बी व्हिजन HDR ला सपोर्ट करतो. याचे वजन फक्त 584 ग्रॅम आहे. सुरक्षिततेसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह मेटल केसिंग आहे.

हा टॅब Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 16GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेज ग्राहकांना मिळेल. टॅबलेट 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9500mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

यात Viper आणि NetEase क्लाउड ऑडिओद्वारे ट्यून केलेले क्वाड स्पीकर मिळतात. टॅब पॅडसाठी नवीन ColorOS वर काम करते, जे Android 14 वर आधारित आहे. याच्या खास फिचर्समध्ये 5G शेअरिंग, स्क्रीन मिररिंग, NFC फाईल ट्रान्स्फर आणि एकाच वेळी तीन ॲप्ससाठी व्हर्च्युअल स्क्रीन यांसारख्या फिचर्सचा समावेश आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी यात 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. टॅब ब्लूटूथ v5.3 आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

किती आहे किंमत?

OnePlus ने हा टॅबलेट स्पेस ग्रे आणि खाकी ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. हा टॅब रॅम आणि स्टोरेजनुसार चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येते. याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 2899 युआन (अंदाजे 33,280 रुपये), 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 3099 युआन (अंदाजे 35,575 रुपये), 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अंदाजे 3399 युआन (सुमारे 39,020 रुपये), 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 3799 युआन (अंदाजे 43,612 रुपये) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : सूर्याचा आज पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश, कोणकोणत्या राशींचे भाग्य पालटणार? वाचा राशी भविष्य

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

SCROLL FOR NEXT