Union Budget 2025 Highlights : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प GYAN (गरीब, युवा, अन्नदाता, नारीशक्ती) यांच्यावर केंद्रीत असल्याचे त्यांनी सांगितले. यात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. याशिवाय उत्पन्नदरानुसार नवी कर प्रणाली कशी असेल याचीही माहिती त्यांनी दिली.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या दहा महत्त्वाच्या घोषणा केल्या.
१. अर्थसंकल्पात २०२५-२६ मध्ये करदात्यांना दिलासा मिळणार आहे. १२ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांवर कोणताही कर नसल्याची घोषणा सीतारामन यांनी केली.
२. किसान क्रेडिट कार्ड (KCC) यासाठी व्याज सवलत योजनेची मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
३. अर्थमंत्र्यांनी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना देखील जाहीर केली. यात १०० जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या कृषी योजनेमुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
४. येत्या ३ वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्रे स्थापन करण्याची सुविधा देण्यात येईल. यापैकी २०० केंद्रे याच आर्थिक वर्षामध्ये स्थापन केल्या जातील.
५. ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. पुढील पाच वर्षात यात राष्ट्रीय कौशल्य केंद्र उत्कृष्टता मागील योजनांवर आधारित ५ राष्ट्रीय कौशल्य केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात १० हजार जागा वाढवल्या जातील.
६. ५० पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहेत. वैद्यकीय पर्यटन आणि आरोग्य लाभांना प्रोत्साहन दिले जाईल. संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी २० हजार कोटी रुपये बजेट असणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
७. लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड दिले जाईल. पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील. पंतप्रधान स्वानिधी योजनेची कर्ज मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे.
८. स्टार्टअप्ससाठी देण्यात येणारे कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले असून हमी शुल्कातही कपात केली जाणार आहे. MSME कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले असून यात १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असणार आहे.
९. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर केले जाणार आहे, अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली.
१०. २०२५ मध्ये तब्बल ४० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे यावर्षामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.