Budget 2024 Tax Slab Saam TV
Union Budget 2025 Highlights

New Income Tax Slab 2024: तुमचा पगार किती आणि तुम्हाला टॅक्स किती लागणार?, अर्थमंत्र्यांनी नेमकी काय केली घोषणा?

Budget 2024 New Income Tax Regime: अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार नवीन आयकर प्रणालीमध्ये नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

Priya More

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (finance minister nirmala sitharaman) यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार नवीन आयकर प्रणालीमध्ये नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जुन्या कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार नाही.

नवीन कर प्रणालीमध्ये नोकरदार वर्गाची १७,५०० रुपयांपर्यंतची बचत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ मध्ये करदात्यांना मोठी भेट दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी आयकर संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीमध्ये मानक कर कपात ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये केली आहे.

New Income Tax Slab 2024 after today's budget

नवीन कर प्रणालीमध्ये नवीन कर रचनेची घोषणा करण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त करण्यात आले आहे. ३ ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के कर आकारला जाणार आहे. ७ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारला जाणार आहे. १० ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्क्यांपर्यंत कर आकारला जाणार आहे. १२ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर आकारला जाणार आहे. तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्केच कर द्यावा लागणार आहे.

नवीन कर प्रणालीनुसार कर रचनेमध्ये असा बदल -

  • - ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

  • - ३ ते ७ लाखांपर्यं - ५ टक्के कर

  • - ७ ते १० लाखांपर्यंत - १० टक्के कर

  • - १० ते १२ लाखांपर्यंत - १५ टक्के कर

  • - १२ ते १५ लाखांपर्यंत - २० टक्के कर

  • - १५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT