Union Budget 2024 Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून करदात्यांना मिळणार खूशखबर? टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता

Union Budget 2024 Tax Slab : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार या वर्षी देखील अर्थसंकल्पात अनेक गोष्टी मांडल्या जाऊ शकतात.

कोमल दामुद्रे

Union Budget 2024 Focus On New Tax Regime :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार या वर्षी देखील अर्थसंकल्पात अनेक गोष्टी मांडल्या जाऊ शकतात.

यंदाच्या अर्थसंकल्पातून (Budget) सर्वसामान्यांना खुशखबर मिळू शकते. अशातच स्टँडर्ड डिडक्शनमधून सूट मिळेल का? NPS वर सूट वाढेल का? नवीन कर प्रणालीमध्ये एनपीएसचा समावेश होईल का? करमाफीची मर्यादा वाढणार का? 7 लाख रुपयांची करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढणार का? अशा अनेक गोष्टींबाबत निर्णय होऊ शकतात. तसेच टॅक्स (Tax) स्लॅबची मर्यादा देखील वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारकडून यावेळी करदात्यांना दिलासा मिळू शकतो. सध्या नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. सरकार यामध्ये ७.५० लाख रुपयांपर्यंतचा कर वाढूवे शकते. तसेच महिलावर्गाला वेगळा टॅक्स स्लॅब देखील देऊ शकते. ज्यामध्ये ८ लाख रुपयांपर्यंत (Price) कोणताही कर भरावा लागणार नाही.

१ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. लवकरच देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी सरकार पगार वर्गाबाबत अनेक नवीन घोषण करु शकते. नवीन कर प्रणालीवर लक्ष केंद्रित करण्याचे सरकारचे लक्ष आहे. यावेळी करप्रणालीत अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज आपण श्वास घेतोय - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

SCROLL FOR NEXT