PM Modi On Budget 2024 SAAM TV
Budget

PM Modi On Budget 2024 : अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी; PM मोदींनी सांगितलं अर्थसंकल्पातून काय मिळालं?

PM Narendra Modi On interim Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi On interim Budget 2024 :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget 2024 Session) सुरू झाले असून, आज गुरुवारी निर्मला सितारामन यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात युवक, महिला, शेतकरी, गरीब आदी घटक केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले. अनेक महत्वाच्या योजनांचा उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आला. मात्र, नोकरदार वर्गाला अपेक्षित असा दिलासा मिळू शकला नाही. कररचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळं कर सवलतीसाठी नोकरदार वर्गाला येत्या काळात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Latest News)

निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन. भारताचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प आहे. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. २ कोटी नवी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांसाठीही महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. हा देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. अर्थसंकल्पात २०४७ पर्यंत विकसित भारताची गॅरंटी आहे. त्यात विश्वास भरलेला आहे, असेही ते म्हणाले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींचे मी मनापासून आभार मानतो. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. आज अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जगात एक आत्मविश्वासपूर्ण देश झाला आहे, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT