Uddhav Thackeray : अर्थमंत्र्यांनी मोठ्या जड अंत:करणाने शेवटचा अर्थसंकल्प मांडला, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

Uddhav Thackeray Speech : अयोध्येत राम मंदिर झालं याचा आम्हालाही आनंद आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लढ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newssaam tv
Published On

Uddhav Thackeray On Budget 2024 :

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांना अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत मांडला. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी अभिनंदन करतो. मोठ्या जड अंत:करणाने शेवटचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray News
PM Modi On Budget 2024 : अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी; PM मोदींनी सांगितलं अर्थसंकल्पातून काय मिळालं?

अर्थमंत्री यांनी संसदेत म्हटलं की, सरकार चार जातींसाठी काम करणार आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यासाठी काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाषण केलं. त्यांनी त्यांनी जे धाडस दाखवलं त्यांचं अभिनंदन करतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

निवडणुका जवळ आल्याने हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सुटाबुटातल्या मित्रांचा नसून तरुण, शेतकरी, गरीब आणि महिलांचा आहे, हे आठवलं. दहा वर्षांनंतर तुम्हाला हे लक्षात आलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० वर्षातील अर्थसंकल्पात नुसत्या थापा मारल्या

मोदी सरकारने २०१४ पासून २०२४ पर्यंत १० अर्थसंकल्प मांडले. या सर्वांमध्ये नुसत्या थापा मारल्या. मतं हवं असतील तर 'मेरे प्यारे देशवासियो...' आणि त्यानंतर तुम्ही जगलात काय आणि मेलात काय याचा काहीच फरक पडत नाही. आता घोषणा करतील मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा महागाई वाढवतील, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

केंद्र सरकारचं हे सगळं थोतांड आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्यांना टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता फुकटात गॅस देतील आणि निवडणुकीनंतर दुपटी-तिपटीने गॅसचे भाव वाढवतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray News
Income Tax Slab 2024: करदात्यांना दिलासा नाही; टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, काय आहे कारण?

राम भाजपची खासगी प्रॉपर्टी नाही

अयोध्येत राम मंदिर झालं याचा आम्हालाही आनंद आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लढ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. राम काही भाजपची खासगी प्रॉपर्टी नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com