PM Narendra Modi Speech ANI
Union Budget 2025 Highlights

PM Modi on Budget: अर्थसंकल्पातून देशाला काय मिळालं? PM नरेंद्र मोदींनी एक एक गोष्ट समजून सांगितली, पाहा व्हिडिओ

PM Narendra Modi Speech on Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर PM नरेंद्र मोदींनी एक एक गोष्ट समजून सांगितली. त्यांनी पंतप्रधान मोदींनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पाविषयी एक एक गोष्ट समजून सांगितली. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांना ताकद देणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी लाईव्ह संवाद साधत प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मागील १० वर्षांत २५ कोटी लोक गरीबीशी झुंजत होते. आजचा खरा अर्थसंकल्प गरीबांसाठी आहे. या अर्थसंकल्पामधून असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षा आणि कौशल्यासाठी हा महत्वाचा अर्थसंकल्प आहे'.

'मध्यमवर्गीयांना ताकद देणारा अर्थसंकल्प आहे. मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना आहेत. या अर्थसंकल्पातून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. या अर्थसंकल्पातून छोट्या व्यापाऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,'सरंक्षण दलाला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक तरतुदी या योजनेत करण्यात आल्या. जगातील लोकांचं भारताप्रति आकर्षण वाढलं आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातून हे गरीब आणि मध्यमवर्गीयांना अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रावरही भर देण्यात आला आहे. यंदा करप्रणालीत गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यात आला आहे'.

'तसेच स्टॅडंर्ड डिडक्शन देखील वाढवण्यात आला आहे. टीडीएसच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात आलं. छोट्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. तसेच मध्यमवर्गीयांना अन्नाची उपलब्धता होण्यासाठी होणार आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT