Union Budget 2024: सोने- चांदी आणि प्लॅटिनम स्वस्त होणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Union Budget 2024 Gold-Silver Rate : मौल्यवान धातूंवर म्हणजे सोने आणि चांदीवर 6% आणि प्लॅटिनमवर 6.5% सीमाशुल्क कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
Union Budget 2024 Gold-Silver Rate
Union Budget 2024Saam TV
Published On

अर्थसंकल्पातून सोने-चांदीवरील दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मौल्यवान धातूंवर म्हणजे सोने आणि चांदीवर 6% आणि प्लॅटिनमवर 6.5% सीमाशुल्क कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे सामान्य माणसांना सोने-चांदीच्या दागिन्यांसह प्लॅटिनमचे दागिने देखील स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात.

Union Budget 2024 Gold-Silver Rate
Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून करदात्यांना मिळणार खूशखबर? टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता

गेल्या आठवडाभरापासून येत्या काळात सोने आणि चांदीच्या किंमती जास्त वाढणार असल्याचं म्हटलं जात होते. काही अर्थतज्ज्ञांनी देखील सोने आणि चांदी या वर्षांच्या शेवटपर्यंत १ लाख रुपये प्रति तोळा होणार, अशी शक्यता व्यक्त केली होती. दर वाढणार असल्याने सामान्यांना मोठं टेन्शन आलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीच्या सीमाशुल्कात घट होणार असल्यचं म्हटल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आजच्या किंमती किती?

गूडरिटर्नस या साइटवर आलेल्या दरांनुसार आज १०० ग्राम सोन्याच्या किंमती २,५०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे आजचा १०० ग्रामचा भाव ६,७६,००० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ६७,६०० रुपये इतकी आहे. तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ७३,७३० रुपये आहे.

गेल्या आठवड्यापासून सलग सोन्याचे दर घसरत आहेत. आजही सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्यात. भविष्यात दर १ लाखांपर्यंत पोहचतील या विचाराने अनेकांनी आताच सोने खरेदीसाठी घाई केली होती. मात्र अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Union Budget 2024 Gold-Silver Rate
Union Budget 2024: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय, महागाई पूर्णत: नियंत्रणात; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com