Budget 2025 Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2025: बजेटमधून ज्येष्ठ नागरिकांना काय मिळालं? अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Major Relief for Senior Citizens: सेवानिवृत्त व्यक्ती त्यांच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर बँक ठेवींच्या व्याज उत्पन्नावर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे.

Priya More

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी व्याज उत्पन्नावरील टीडीएसची मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये केली आहे. सेवानिवृत्त व्यक्तींना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सेवानिवृत्त व्यक्ती त्यांच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर बँक ठेवींच्या व्याज उत्पन्नावर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे. सरकारने व्याज उत्पन्नावरील टीडीएसची मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये केल्यामुळे ज्येष्ठांना फायदा होईल. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या बँक ठेवींमधून ५० हजार रुपयांपर्यंतचे व्याज उत्पन्न टीडीएसच्या अधीन नव्हते. त्याला ही सुविधा प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 TTB अंतर्गत मिळत होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर करताना ही ५० हजार रुपयांची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. याचा अर्थ असा की, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला एका आर्थिक वर्षात बँक ठेवींमधून मिळालेले १ लाख रुपयांपर्यंतचे व्याज TDS च्या कक्षेत येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेल्या ठेवींवर आर्थिक वर्षात १ लाख रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल तर बँक किंवा पोस्ट ऑफिस त्यावर टीडीएस कापणार नाही. यापूर्वी बँका किंवा पोस्ट ऑफिस ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्नावर १० टक्के कर कापत होते. पॅन नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत बँका १० टक्के टीडीएस कापतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT