Budget 2024 Update Saam Digital
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Update: IMEC ची इतिहासही घेईल नोंद, अर्थसंकल्पात उल्लेख केलेल्या प्रकल्पाला इंतक महत्त्व का? जाणून घ्या

Budget 2024 Update News: अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी भारत मध्य पूर्व-युरोप व्यापार कॉरिडॉरचा (IMEC) उल्लेख केला आणि हा कॉरिडॉर येत्या 100 वर्षांत जागतिक व्यापाराच केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Sandeep Gawade

Budget 2024 Update

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी भारत मध्य पूर्व-युरोप व्यापार कॉरिडॉर (IMEC) चा उल्लेख केला आणि हा कॉरिडॉर येत्या 100 वर्षांत जागतिक व्यापाराच केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोविड महामारीनंतर एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येत आहे. जग अतिशय कठीण काळातून जात असताना भारताने G20 चे आयोजन केले होते. साथीच्या रोगामुळे अन्न संकट, खतांचा तुटवडा, अन्न आणि वित्तपुरवठा अशा परिस्थितीत भारताने यशस्वीरित्या मार्ग काढला काढल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी G20 शिखर परिषदेदरम्यान जाहीर झालेला भारत मध्य पूर्व-युरोप व्यापार कॉरिडॉर भारत आणि संपूर्ण जगासाठी गेमचेंजर ठरणार आहे. निसर्गासोबत समृद्धी मिळवणे आणि प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्याची संधी देणे हे विकसित भारताचे ध्येय आहे. हा कॉरिडॉर येत्या 100 वर्षांत जागतिक व्यापाराचं केंद्र बनेल आणि हा कॉरिडॉर भारतीय भूमीवर सुरू झाला याची इतिहासात याची नोंद, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे IMEC?

IMEC हा भारताला मध्य-पूर्वेद्वारे युरोपशी जोडणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या G-20 शिखर परिषदेत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर 9 सप्टेंबर रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि त्याचे वर्णन ऐतिहासिक करार म्हणून करण्यात आलं होतं. भारताव्यतिरिक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), युरोपियन युनियन, फ्रान्स, इटली आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे.

या अंतर्गत एक मोठ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील जाईल. ज्यामध्ये भारत रेल्वे आणि समुद्राच्या माध्यमातून युरोपशी जोडला जाईल. याच्याशी निगडित देशांसाठी व्यापार आणि दळणवळण खूप सोपे होईल. हा प्रकल्प कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकासासाठी पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढेल, असा विश्वास आहे.भारतातील मुंबई ते यूएई असा सागरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. हे शिपिंग नेटवर्क रेल्वे नेटवर्क तयार करून संपूर्ण मध्य पूर्वेला जोडले जाईल. रेल्वेचे जाळे UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इस्रायलपर्यंत विस्तारेल. मध्यपूर्वेमध्ये टाकलेले हे रेल्वेचे जाळे पुन्हा एकदा सागरी मार्गाशी जोडले जाणार आहे. इस्रायलच्या हैफा बंदर ते इटली आणि इस्रायल ते फ्रान्स रेल्वे नेटवर्क दोन सागरी मार्गांशी जोडले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT