Budget 2024 Update Saam Digital
Budget

Budget 2024 Update: 7 IIT,16 IIIT, 15 AIIMS आणि 390 विद्यापीठ; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय दिलं?

Sandeep Gawade

Budget 2024 Update

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे असणार आहे. निवडणुकीनंतर सत्तेवर येणारं नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. अंतरिम अर्थसंकल्प ही एक अल्पकालीन आर्थिक योजना आहे, जी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी सरकारच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मंजुरी घेते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडतांना विविध क्षेत्रातील उत्पन्न आणि खर्चाची माहिती दिली, ज्यात शिक्षण क्षेत्रातील संधींचा देखील समावेश आहे.

शिक्षण क्षेत्राचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्या कामगिरीची आठवण करून दिली. स्किल इंडियाने याआधी १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे. यातून तरुणांचं भविष्य आणखीन उज्ज्वल होईल. देशभरात 7 नवीन भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), 16 IIIT (ट्रिपल IT) आणि 390 विद्यापीठ उभारण्यात आली आहेत. याशिवाय 15 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची उभारणी करण्यात आली आहे. अनेक तरुणांना डॉक्टर बनून देशाला आरोग्य सेवा देण्याची इच्छा आहे. त्यासाठी आणखी वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. त्यासाठी सर्वप्रथम एक समिती स्थापन केली जाईल, जी याबाबत निर्णय घेणार आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी आज सहावा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे करदात्यांना कोणताही दिलासा या बजेटमध्ये मिळालेला नाही.

आज सादर झालेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नवीन सरकार पुन्हा एकदा अर्थसंकल्प मांडेल. त्यावेळी टॅक्स स्लॅबबाबत काही मोठ्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT