Union Budget 2024, Smart Phone, Mobile Phone Price  Saam tv
Budget

Union Budget 2024 : स्मार्टफोन होणार स्वस्त? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

कोमल दामुद्रे

Mobile Phones Become More Affordable :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार या वर्षी देखील मोबाईल उपकरणांच्या काही गोष्टींवर कस्टम ड्युटी कमी केली जाऊ शकते.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह मध्ये जाहिर झालेल्या अहवालात सरकारने स्मार्टफोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आयात शुल्क कमी करु नका असे म्हटले जाते आहे. संशोधकांच्या मते असे म्हटले गेले आहे की, सध्याचे दर कायम ठेवल्यास भारतातील उद्योगात वाढ व्हावी आणि त्यांच्यात समतोल राखला जाईल.

1. कस्टम ड्युटीमध्ये सवलत मिळण्याची शक्यता

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात (Budget) सरकार स्मार्टफोनच्या (Smartphone) अनेक गोष्टीवर कस्टम ड्युटी शुल्कात सवलत मिळू शकते. यामुळे स्मार्टफोनच्या किंमती (Price) कमी होऊ शकतात. तसेच या आर्थिक वर्षात स्मार्टफोन स्वस्त होऊ शकतो. ग्राहकांना कमी किमतीत फोन मिळेल की, नाही हे स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांवर अवलंबून असेल.

मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्मार्टफोनच्या कॅमेरा लेन्ससह काही इलेक्ट्रॉनिक वस्तूवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली होती. फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम- आयन बॅटरीवर सवलत वर्षभरासाठी वाढवण्यात आली आहे.

2. स्मार्टफोनच्या किमती कमी होतील?

केंद्र सरकारचा मेक-इन-इंडिया कार्यक्रमात स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना भारतात उत्पादनासाठी प्रकल्प उभारण्यासाठी आकर्षित करत आहे. त्यातच अॅपलने भारतात त्याच्या उत्पादन वाढवले आहे. गुगलने सुद्धा Pixel स्मार्टफोन भारतात बनवण्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी केल्यावर स्मार्टफोनची किंमत कमी करण्याचा निर्णय कंपनीवर असेल असे म्हटले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT