Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार? PM किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता

Union Budget 2024 In Farmer : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये सरकार आनंदाची बातमी देऊ शकते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत सुमारे ५० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Budget 2024
Budget 2024Saam Tv
Published On

PM Kisan Yojana Increase Money :

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये सरकार आनंदाची बातमी देऊ शकते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत सुमारे ५० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

अर्थतज्ज्ञांच्या मते, ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. ही रक्कम वार्षिक ६००० ते ९००० रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. २०१९ मध्ये पीएम-किसान (PM Kisan) योजना सुरु करण्यात आली होती. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढवणे त्याचा उद्देश होता.

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये जमा केले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही सरकार किसान सन्मान निधीच्या माध्यामातून अर्थसंकल्पात वित्तपुरवठा करणार आहे. यामुळे गावातील मोठ्या लोकसंख्येला या योजनेचा थेट लाभ झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत.

Budget 2024
Petrol Diesel Rate Today (30th Jan 2024): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती?

२०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु झाल्यापासून ती अधिक लोकप्रिय झाली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही योजना सरकारने सुरु केली होती. सध्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ६०,००० कोटी रुपये खर्च केले होते. अशातच या योजनेची रक्कम वाढवणे अपेक्षित आहे. याशिवाय पीक विमा आणि ग्रामीण रोजगार योजनेच्या रकमतेही वाढ होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार काही उपाययोजनाही करु शकते. त्याचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे. अर्थतज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, सरकार पीएम- किसान अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम सुमारे ५० टक्क्यांनी वाढू शकते. ही रक्कम वार्षिक ६००० वरुन ९००० रुपये केली जाऊ शकते. याबाबतची माहिती एचडीएफसी बँकेच्या प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट साक्षी गुप्ता यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com