पुणे रेल्वे स्टेशन
पुणे रेल्वे स्टेशन - Saam Tv
ब्लॉग

पुणे स्टेशन आणि 'ती' दोन वर्षे.....

साम टिव्ही

(प्राची कुलकर्णी)

हावी नंतर पुण्यातल्या Pune एसएसपीएमएस शाळेत SSPMS School ॲडमिशन घेतली आणि अप डाउन सुरु झालं. पहाटेच्या रेल्वेनं Railway पुण्यात यायचं आणि संध्याकाळी ४ च्या रेल्वेने माघारी जायचं. दररोज शाळा दोन वाजता सुटत असल्याने पुढचे २ तास स्टेशनवर Station घालवण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हे दोन तास दररोज नको नको करुन सोडायचे. Women feel unsafe on Pune Railway Station

स्टेशनवर पाय ठेवला की नकोशा नजरांचा पाठलाग सुरु व्हायचा. साधं चहा किंवा पेपर खरेदी करायला गेलं तरी नकोसा स्पर्श...पण हे फक्त इतक्या पर्यंतच मर्यादित नव्हतं.. एकदा शाळेतून चालत असताना अचानक एक मुलगा स्वत:चे प्रायव्हेट पार्ट्स दाखवत समोर आला. सोबत मैत्रीणी असुनही आम्ही सगळ्याच घाबरलो.. तेव्हा पोलिसांकडे मदत मागायची किंवा तक्रार करायची अक्कल नव्हतीच. आणि असती तरी तिथे पोलिस कुठे होते तक्रार करायला?

नंतर काहीच दिवसांनी रेल्वेने दौंडला माघारी जात होते. तेव्हाची डबल डेकर असलेली पुणे दौंड शटल तुलनेने रिकामीच होती. माझ्या समोरच्या बाकावर मिलिटरी युनिफॅार्म मधला एक जण येउन बसला. आधी समोर बसलेला तो काही काळाने शेजारी आला. तुझी मिलिटरी स्कुल आहे का, म्हणत शाळेच्या जाडजूड अशा पोलिस बेल्ट सारख्या बेल्टला हात लावत त्याचे चाळे सुरु झाले. याच बेल्टने बदडायची त्या माणसाला धमकी देत मी तिथून पळ काढला. त्यातल्या त्यात ओळखीचे लोक शोधत त्या बोगीत जाउन बसले.

एकदा आमच्या ग्रुपची रेल्वेत छेड काढणाऱ्या मुलाला स्टेशन जवळच चोपलं.. त्यानं माफी मागितली.. पण हे किती पुरणार होतं? भांडणं मारामारी किती पुरेशी पडणार होती? सुरक्षित वाटण्यासाठी काही यंत्रणा आजुबाजूला नसेल तर करणार तरी काय? Women feel unsafe on Pune Railway Station

परवा स्टेशन वरच्या दोन रेप केसेसच्या निमित्ताने हे सगळं आठवलं.. आणि पुन्हा अंगावर काटा आला. त्यावेळी हे घरी सांगावं किंवा पोलिसांकडे तक्रार करावी असं काही सुचलं नव्हतं.. खरंतर पोलिसांकडे जाण्याइतकं हे गंभीर आहे, हे कळण्याची अक्कलही नव्हती. आज मात्र या घटना पाहतांना पुणे स्टेशन अजुनही तितकंच असुरक्षित आहे हे जाणवतंय.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

Breaking News: बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ५.७७ टक्के मतदान

Ajit Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर अपघातांची मालिका थांबेना! सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात; ४ जण जखमी

SCROLL FOR NEXT