पोट भरण्यासाठी खाडीचा हातभार... प्रदीप भणगे
ब्लॉग

पोट भरण्यासाठी खाडीचा हातभार...

कालौघात खाडीची ओळख पुसट झाली असली आणि जलप्रदूषणामुळे खाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी 'लोकांच्या उदरभरणा'चा वसा ही खाडी आजही जपत असल्याचे दिसत आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची साक्षीदार म्हणजे कल्याणची खाडी आणि परिसर. त्यासोबतच प्राचीन काळी देशातील प्रमूख जलमार्गांपैकी एक अशीही या खाडीची ओळख आहे. मात्र काळाच्या ओघात ही ओळख काहीशी पुसट झाली असली आणि जलप्रदूषणामुळे खाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी 'लोकांच्या उदरभरणा'चा वसा ही खाडी आजही जपत असल्याचे दिसत आहे. (The hand of the creek to fill the stomach)

हे देखील पहा -

कल्याण - भिवंडी मार्गावरील कोन गावात राहणारे मंगल गावडे कुटुंबिय. घरी अठरा विश्वे दारिद्र्य. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या विवंचनेत असणाऱ्या गावडे कुटुंबियांसाठी कल्याणची खाडी ही मोठा आधार ठरत आहे. कल्याणच्या खाडीमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात देव-देवतांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यासोबतच एरव्ही खाडीकिनाऱ्या काठावर अर्थातच गणेश घाटावर विविध धार्मिक विधी होत असतात. त्यामुळे बऱ्याचदा निर्माल्यासोबतच काही जण बऱ्याचदा सुट्टे पैसे (नाणी) आणि कधी कधी सोनं, चांदीही खाडीमध्ये सोडत असतात. जी शोधून काढत गावडे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून आपला उदरनिर्वाह चालावत आहेत.

खाडीला दररोज ठराविक वेळेनुसार भरती आणि ओहोटी येत असते. त्यात ओहोटी लागल्यानंतर पुन्हा भरती येईपर्यंतच्या काळांत मंगल गावडे या खाडीतून पैसे शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याजवळ असणाऱ्या पसरट थाळीसदृश्य भांड्याच्या सहाय्याने खाडीचा गाळ उपसतात आणि त्यात मग त्यांना काही वेळा सुट्टे पैसे, नाणी किंवा धातूच्या वस्तू सापडतात.

गेल्या काही वर्षांपासून आपण हे काम करत असून आपल्याला दररोज सुमारे 200 ते 300 रुपये सापडत असल्याचे मंगल गावडे यांनी सांगितले. तर कधी नशीब चांगले असेल तर सोनं - चांदीही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे वाचायला आणि ऐकायला काहीसं सोपं काम वाटत असलं तरी त्यामागची त्यांची मेहनत मात्र थक्क करणारी आहे. खाडीच्या भरती आणि ओहोटीच्या वेळांवर त्यांचं हे काम अवलंबून असून खाडीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातही भरती-ओहोटी येत असते. त्याचा अंत आणि ठाव त्या खाडीलाही माहीत नाही आणि मंगल गावडे यांनाही...

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT