ब्रिटिशांनी तारलं, पाटबंधारे विभागानं मारलं! निफाडमधील शेतकऱ्यांची व्यथा...

ब्रिटिशकालीन नाले आणि कालवे कालौघात नामशेष झाल्यानं 1400 ते 1500 हेक्टर शेतजमीन आणि पिकं दरवर्षी पाण्याखाली जात असल्यानं शेतकऱ्यांच मोठं नुकसान होतंय.
ब्रिटिशांनी तारलं, पाटबंधारे विभागानं मारलं! निफाडमधील शेतकऱ्यांची व्यथा...
ब्रिटिशांनी तारलं, पाटबंधारे विभागानं मारलं! निफाडमधील शेतकऱ्यांची व्यथा...
Published On

नाशिक: ब्रिटिशांनी तारलं, मात्र सरकारनं नागवलं, असं म्हणण्याची वेळ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. कारण दरवर्षी निफाड तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचं अतिरिक्त पाणी गोदावरीला वाहून जाण्यासाठी ब्रिटिशांनी या भागात ब्रिटीशकालीन कालवे आणि नाल्याचं जाळं तयार केलं होतं. मात्र त्यानंतर वर्षानुवर्षे या ब्रिटिशकालीन कालवे आणि नाल्यांची देखभाल दुरुस्ती आणि डागडुजी न करण्यात आल्याने कालौघात यापैकी काही कालवे आणि नाले आता नामशेष झालेत. (Saved by British, harassed by Irrigation Department! The plight of farmers in Niphad)

हे देखील पहा -

इतकंच काय तर गावच्या नकाशावरूनही गायब झालेत. त्यामुळे पूर्वी नाल्यांच्या माध्यमातून वाहून जाणारं पावसाचं अतिरिक्त पाणी आता शेतात साचून राहू लागल्यानं शेतकऱ्यांना दरवर्षी कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागतंय. या भागातील 12,13,14,15,16 आणि 17 या ब्रिटिशकालीन नाल्यांचं अस्तित्वचं संपुष्टात आल्यानं पावसाचं पाणी गोदावरीला वाहून न जाता देवगाव, कोळगाव, कानळद आणि परिसरातल्या तब्बल 1400 ते 1500 हेक्टर क्षेत्रावरील शेतांमध्ये पसरतं.

एखाद्या धरणाच्या बॅकवॉटरला जशी परिस्थिती असते, तशीच परिस्थिती या भागातल्या शेतशिवारांची होते. शेतांमध्ये पाच-सहा फुटांहून अधिक पाणी साचतं, उभी पिकं पूर्णपणे पाण्याखाली जातात, शेतशिवारातले रस्ते बंद होतात. परिणामी शेतकऱ्यांचा संपूर्ण एक हंगाम केवळ वायाचं जात नाही, तर होणारं नुकसानही कोट्यावधींच्या घरात जातं. दरवर्षी या भागात अशीच परिस्थिती होते. पावसाळा संपला तरी डिसेंबर-जानेवारीपर्यंत शेतात पाणी साचून रहात असल्यानं हातची पिकं वाया जातात.

ब्रिटिशांनी तारलं, पाटबंधारे विभागानं मारलं! निफाडमधील शेतकऱ्यांची व्यथा...
कलम ३७० हटवून सुद्धा परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही - संजय राऊतांची टीका...

गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी या भागात हीच परिस्थिती असूनही सरकार आणि प्रशासन मात्र शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे लक्ष द्यायला तयार नाही. कालवे आणि नाल्यांची डागडुजी, खोलीकरण करण्याचे शेकडो निवेदनं, अर्ज या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाला दिलेत. मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभार इथल्या हजारो शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय. त्यामुळे ब्रिटिश परवडले मात्र सरकारनं नागवलं अशी व्यथा इथल्या शेतकऱ्यांनी साम टिव्हीकडे मांडली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com