Padma Award: आझादांच्या ‘पद्म’वरून काँग्रेसमध्येच घमासान - Saam Tv
ब्लॉग

Padma Award: आझादांच्या ‘पद्म’वरून काँग्रेसमध्येच घमासान

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना ‘पद्मभूषण’ सन्मान जाहीर झाल्यानंतर पक्षामध्ये अंतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना ‘पद्मभूषण’ सन्मान जाहीर झाल्यानंतर पक्षामध्ये अंतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत भाष्य करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते करणसिंह हा राष्ट्रीय सन्मान पक्षांतर्गत वादाचा विषय ठरता कामा नये असे म्हटले आहे. आपल्यातीलच एखाद्या सहकाऱ्याचा या राष्ट्रीय सन्मानाने गौरव करण्यात येत असेल तर त्याला उलट आपण शुभेच्छा द्यायला हव्यात, टोमणे मारून त्याचे खच्चीकरण करता कामा नये असे करणसिंह म्हणाले. (Congress Reactions over Padma Award to Gulam Nabi Azad)

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ सन्मानांची (Padma Awards) घोषणा केली होती. ज्येष्ठ ‘माकप’ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता त्यावर भाष्य करताना काँग्रेसचेच (Congress) वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ‘आझाद’ यांनीही आता ‘गुलाम’ होऊ नये, असे वक्तव्य केले होते. या पुरस्काराच्या घोषणेनंतर काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जी-२३’ आझाद यांना शुभेच्छा देत अभिनंदन केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते.

या वादावर काल करणसिंह यांनी मौन सोडताना अशा प्रकारचे राष्ट्रीय सन्मान वादांचा विषय ठरता कामा नयेत असे म्हटले आहे. ‘जी-२३’ गटातील अन्य नेते आनंद शर्मा, भूपिंदरसिंह हुडा, मनीष तिवारी, शशी थरूर आणि राज बब्बर यांनी आझाद यांचे स्वागत केले आहे. शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही जयराम रमेश यांच्या वक्तव्यातून त्यांचा कोतेपणा दिसून येतो असे म्हटले आहे.

उधमपूर येथून मी १९७१ मध्ये दुसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरलो तेव्हा माझ्या प्रचारात सक्रिय सहभागी होती आझाद यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. कठोर मेहनत, समर्पण आणि प्रशासकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी पी.व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवले होते. सलग सात वर्षे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते या नात्यानेही त्यांनी भरीव काम केले आहे. - करणसिंह, ज्येष्ठ काँग्रेस नेते

आझाद यांच्यावर टीका करणे ही लाजीरवाणी बाब असून ते काँग्रेस पक्षाच्या मूल्याशी सुसंगत नाही -अश्वनीकुमार, माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

आझादांच्या कार्याचा देशाने सन्मान केला असून आज असा ज्येष्ठ नेता काँग्रेसलाच नको झाला असेल तर तो मोठा विरोधाभासच म्हणावा लागेल. मी मात्र मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. - कपिल सिब्बल, नेते काँग्रेस

गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण हा सन्मान देण्याचा निर्णय राजकीय सोयीने घेण्यात आला असून यामध्ये कोठेही गुणवत्तेचा विचार झालेला दिसत नाही - वीरप्पा मोईली, ज्येष्ठ नेते काँग्रेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT