मुंडे- बहीण भावाच्या वादात काँग्रेस खासदारांनी मारली बाजी; नक्की प्रकरण काय?

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून, निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रतिष्ठेसाठी वाटेल ते करून सत्ता आणू असा दावा केला जात होता.
Pankaja Munde, Rajani Patil & Dhananjay Munde
Pankaja Munde, Rajani Patil & Dhananjay MundeSaam TV
Published On

बीड: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ...अशी म्हण आपण ऐकली असेल मात्र बीडमध्ये याचा प्रत्यय आला आहे. नुकत्याच झालेल्या बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकामधील (Nagar Panchayat Election) विजयाच्या आणि सत्ता स्थापनेच्या श्रेय वादावरून मुंडे बहीण भावात जुंपली असताना, याचा फायदा घेत काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी, केज नगरपंचयातमध्ये बाजी मारत जनविकास आघाडी सोबत सता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना धक्का समजला जात आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून, निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रतिष्ठेसाठी वाटेल ते करून सत्ता आणू असा दावा केला जात होता. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जनविकास आघाडी ही भाजपा पुरस्कृत आहे, केजमध्ये नगराध्यक्ष भाजपचा होणार. अस जाहीर भाषणात म्हटलं होतं. या वक्तव्याला खुद्द जनविकास आघाडीचे प्रमुख हारून इनामदार यांनी विरोध दर्शवत कोणत्याही पक्षाची पुरस्कृत आघाडी नसून आमची केज शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली, ही जनविकास आघाडी आहे. त्यामुळे भाजपा पुरस्कृत आघाडी हा दावा चुकीचा आहे. असं हारून भाई इनामदार यांनी सांगितले.

Pankaja Munde, Rajani Patil & Dhananjay Munde
कापसाच्या दरात मोठी वाढ; हमीभावापेक्षा कापसाला मिळतोय जास्त दर

स्थानिक राष्ट्रवादीचे नेते ही गलिच्छ राजकारण करत आहेत ,केजच्या नागरिकांच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असून खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करून दाखवणार. असल्याचं काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य आदित्य पाटील यांनी बोलून दाखवलं, महाविकास आघाडी सत्तेत जरी एकत्र असलो तरी स्थानिक विकासाच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीला दूर ठेवल आहे. असं देखील आदित्य पाटील यांनी सांगितलं

तर केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. यात भाजप कडून आणि राष्ट्रवादी कोण दावे-प्रतिदावे केले जात होते. मात्र यावर आत पडदा पडला असून केजच्या विकासासाठी काँग्रेसच्या खा रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनविकास परिवर्तन आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन करणार आहेत."आपलं गाव आपलं सरकार" ही संकल्पना घेऊन आम्ही आता गावात विकास काम करू. असही यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान नगर पंचायत निवडणुकीवरून मुंडे बहीण भावात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतांना, आणि सत्ता स्थापनेसाठी डावपेच आखत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. खासदार रंजनीताई पाटील यांनी बाजी मारल्यानं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ याचा प्रत्यय आल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com