कापसाच्या दरात मोठी वाढ; हमीभावापेक्षा कापसाला मिळतोय जास्त दर

अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे हादरलेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दिलासा देणारी ठरली आहे. मध्यंतरी कापसाच्या दरात घसरण झाली होती.
Akot Market Committee
Akot Market CommitteeSaam TV
Published On

अकोला: गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात घसरण होत असताना आज कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अकोल्यातील (Akola) अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या दराने साडे दहा हजारांचा आकडा ओलांडत कापूस पावणे अकरा हजारांवर गेला आहे. अकोट बाजार समितीत (Akot Market Committee) कापूस 10 हजार 705 रुपये दराने खरेदी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुई आणि सरकीच्या दरात वाढ झाल्याने विदर्भाच्या बाजारात कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा साडे चार हजार रुपयांहून अधिकचा दर क्विंटलमागे मिळत आहे.

अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे हादरलेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दिलासा देणारी ठरली आहे. मध्यंतरी कापसाच्या दरात घसरण झाली होती. आता पुन्हा पांढरं सोनं अकरा हजारावर जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे. बोंड अळी, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तर देशातील महाराष्ट्र सह अनेक राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत असल्याने येत्या काळात पांढऱ्या सोन्याला आणखी चकाकी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com