आंदोलनाऐवजी सत्तेसाठी थेट लढण्यावर भर.
पराभवानंतर पक्ष पुनरुज्जीवनाची सुरुवात.
कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचे आवाहन.
महापालिकांच्या निवडणुकांममध्ये उद्धव ठाकरेंशी युती करत महायुतीची धडधड वाढवणाऱ्या मनसेनं पक्ष कार्यक्रमाचा नवा गिअर टाकलाय. आता नारे,आंदोलन, रस्त्यावरची लढाई नको तर थेट सत्तेची लढाई लढा, असा कानमंत्र राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यक्रत्यांना दिला आहे. त्यादृष्टीने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. गुरुवारी मनसेचा वर्धापनदिन असणार महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी पक्षाची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनांऐवजी आता थेट सत्तेसाठी लढा द्या , असा कानमंत्र दिलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर राज ठाकरेंनी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयांना भेट देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. आपआपसातील वाद विसरून आता सत्ता मिळवण्यासाठी कामे करण्याचा कानमंत्र दिलाय. स्थानिक स्वराज संस्थ्यांच्या निवडणुकांचा पराभव राज ठाकरेंच्या जिव्हारी लागलाय. निकालाच्या काही दिवसानंतर ते कामाला लागले असून त्यांनी बैठकांचा धडका लावलाय. या बैठकांमध्ये ते आता कार्यकर्त्यांना सत्तेसाठी लढाई करण्याच्या सुचना देत आहे.
निवडणुका जिंकण्यावर भर द्या असा सल्ला राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना देत आहे. त्यामुळे खळ खट्टाक आंदोलन, असो की भाषेसाठी होणारी तोडफोड, आणि इतर मुद्द्यांसाठी होणारी आंदोलनं. यात जितका जोर कार्यकर्त्यांकडून लावला जातोय तितकाच जोर आणि खर्च आता पक्ष उभारणी, मोट बांधणी आणि निवडणुकांसाठी लावला जाणार आहे.
भाजप ज्याप्रमाणे भाजप बेरीजचं राजकारण करते त्याचप्रमाणे अगदी काहीशी रणनीती आखत मनसे पुढील वाटचाल करणार आहे. मनसे आता आंदोलन करणारा पक्ष असल्याची ओळख पुसून टाकत सत्तेसाठी लढणार आहे. हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे,मराठी भाषा, टोलनाके,अशी विविध आंदोलनं मनसेनं केली होती. महाराष्ट्रातली ही तीन प्रमुख आंदोलन जी राज ठाकरेंनी दमदारपणे हाती घेतली. मनसेच्या या आंदोलनांनी महाराष्ट्रात वादळ उठवली. त्यासोबतच आंदोलन करणारा पक्ष अशी मनसेची ओळख झाली.
आता मात्र मनसेन आंदोलन करणारा पक्ष ही आपली ओळख बदलायची ठरवलंय. मनसेच लक्ष असणार आहे पक्ष संघटना बांधणी आणि आगामी निवडणुका थेट पक्षाचा कार्यक्रमच बदलण्याच्या सूचना राज ठाकरेंनी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्यात. त्याचीच प्रचिती आपल्याला मागील काही राजकीय घडामोडीवरून येते. कल्याण-डोंबिवली, उद्धव ठाकरेंशी स्वीकृत पदाबाबतची चर्चा, त्यानंतर लातूरमधील रेणापूर पंचायत समितीमधील आखलेल्या रणनीतीतून मनसेनं याची सुरुवात केल्याचं जाणवतं.
पक्ष संघटना आणि काही निवडणुकांचे नियोजन करा, असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी दिलेत. आता आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनीही तोच संदेश देतील. गेल्या 20 वर्षांच्या काळात पक्ष म्हणून आपण ज्या-ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे, असा दावा राज ठाकरे करतात,पण मनसे फक्त आंदोलना पुरती उरली आहे का असा प्रश्न पडतो.
राज ठाकरेंच्या आंदोलनांची चर्चा झाली त्यांच्या सभांना गर्दीही झाली, पण त्याचे रूपांतर मतांमध्ये काही झाले नाहीये. मनसेची प्रादेशिक आणि आक्रमक राजकीय पक्ष म्हणून प्रतिमा तयार होण्यात या आंदोलनांचा मोठा वाटा आहे, पण या आंदोलनांचा मनसेला विशेष राजकीय फायदा झाला नाही.
मनसेने केलेली अनेक आंदोलन कालांतराने थंड झाली. मनसेच्या आंदोलनांमध्ये आणि भूमिकांमध्ये सातत्य राहिलं नाही. मनसेच्या स्थापनेनंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे एका फटक्यात 13 आमदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या सगळ्या महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पदरी अपयश आलं.
मनसेचा प्रभाव मुंबई आणि काही प्रमाणात नाशिक पलीकडे विस्तारलं नाही. मनसेची म्हणावी तशी संघटनात्मक बांधणी झालीच नाही. आता हे सगळं लक्षात आलं म्हणून की काय राज ठाकरेंनी पक्षाचा अजेंडाच बदलायचा ठरवलय. त्यामुळे आंदोलनाऐवजी मनसे आता लोकांमध्ये जात सत्तेसाठी लढाई करणार आहे. आदेशानंतर कार्यकर्ते सक्रीय होतात, आंदोलन होतात, पण आंदोलनं संपल्यानंतर पुन्हा पक्षामध्ये मरगळ येते त्याच्यामुळे जर कायमस्वरूपी पक्षाची बांधणी करायची असेल तर लोकांमध्ये जा असा आदेश राज ठाकरे मुंबईसह राज्यातील मनसैनिकांनी देतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.