Pune : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणांत ६.७५ टीएमसी पाण्याची आवक

Pune Water Storage News : पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे.
Heavy Rainfall Pune Water Dam
Heavy Rainfall Pune Water Dam AI Image
Published On
Summary
  • मुळशी धरण परिसरात ५५ मिमी पावसाची नोंद

  • रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी

  • गेल्या २४ तासांत धरणांमध्ये ६.७५ टीएमसी पाण्याची आवक

  • १ जूनपासून आतापर्यंत ४१४.२४ टीएमसी पाणी

पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानंतर रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मुळशी धरण परिसरात सर्वाधिक ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील धरणांमध्ये तब्बल ६.७५ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, १ जूनपासून आतापर्यंत ४१४.२४ टीएमसी पाणी धरणांमध्ये दाखल झाले आहे. आवक सुरू असल्याने जिल्ह्यातील २४ धरणांतून विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.

मुळशी, मावळ, भोर, वेल्हा तसेच घाटमाथ्यावरील भागात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. रविवारी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने आवकेचा वेग मंदावला असला, तरी अधूनमधून सरी सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे मुठा, पवना, भीमा, भामा, इंद्रायणी, कानंदी, कऱ्हा, कुकडी आणि घोड नद्यांचा प्रवाह सुरूच आहे.

Heavy Rainfall Pune Water Dam
Shravan Fast : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

मुठा खोऱ्यात टेमघर येथे १८ मिलिमीटर, तर नीरा खोऱ्यात भाटघर येथे २२ आणि नीरा देवघर येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावर वळवण येथे ३४, लोणावळा २९ आणि कुंडली येथे २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Heavy Rainfall Pune Water Dam
Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

पश्चिम भागातील पावसामुळे भात उत्पादक पट्ट्यात पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. पावसाने घेतलेली उघडीप भात पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र, पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने बारामती, इंदापूर, दौंड आणि शिरूर परिसरातील सोयाबीन, बाजरी, मका, कडधान्ये आणि चारा पिकांना आणखी पावसाची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com