Amit Shah Pune Visit maharashtra political news Live Updates-breaking-news-today 6th august 2023 latest marathi news  Saam TV
ब्लॉग

Maharashtra News Live : हे आश्वासनवर आश्वासन देणारं सरकार; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Breaking News Live Updates: आज १४ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...

Satish Daud

आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

महत्वाची चर्चा सुरू असताना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित नव्हती. कोस्टल रोडला टोल लावण्याचं षडयंत्र मुख्यमंत्र्यांचं आहे. मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर एवढेच माहितीये. महविकास आघाडीने केलेली कर्ज माफी शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीय. आमचं सरकार येणार आणि आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार आश्वासन दिलं जातं. परंतु गोविंदा पथकांना अजूनही साहसी खेळाचे दर्जा दिलेला नाही. आश्वासनवर आश्वासन देणार सरकार आहे.

महायुती समन्वय समितीच्या बैठकीला सुरूवात

या बैठकीत विधीमंडळात कोण- कोणत्या मुद्दे आणि प्रश्नावर चर्चा केली जाणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुनिल तटकरे, उपस्थित आहेत.

धनगर आरक्षण संदर्भात बैठकीस विधानभवनात सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षण संदर्भात बैठक सुरू झालीय. या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थित आहेत.

Gadchiroli News : धानोरामध्ये चकमक, २ नक्षलवादी ठार, तासभर सुरू होता गोळीबार

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षली ठार गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील घटना छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांची एक मोठी तुकडी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती सर्च ऑपरेशनवेळी नक्षलवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार पोलिसांकडून सडेतोड प्रत्युत्तर जवळपास एक तास सुरू होता गोळीबार

Government Employee Strike : सरकारी कर्मचारी संप मागे घेणार? बैठकीत चर्चा सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनानंतर सरकारी कर्मचारी संघटनांची तातडीची बैठक

संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरू

थोड्याच वेळात संप मागे घेण्याची शक्यता

विश्वसनीय सूत्रांची माहिती

जुन्या पेन्शनसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांचे विधानसभेत निवेदन

जुनी पेन्शन योजना निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत यासंदर्भात शिंदेंनी निवेदन केले.

नगर: मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून तुफान हाणामारी

प्रसिद्ध अशा मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून हाणामारी

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या सभेमध्ये बरसल्या लाठ्याकाठ्या

तीन ते चार जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

पाथर्डी पोलिसांनी घेतली मढी येथे धाव, दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्याचे काम सुरू

Milk Price Hike : दूध दरवाढीसाठी पंढरपूरमध्ये युवा सेनेचे आंदोलन

पंढरपूर :

दूध दरवाढीच्या मागणीसाठी युवा सेनेने (ठाकरे गट) आज पंढरपूरजवळच्या आढीव येथे रास्तारोको केला. युवा सेनेचे रणजीत बागल यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पंढरपूर -कुर्डूवाडी महामार्गावर रास्ता रोको केला. गायीच्या दूधाला ४० रुपये तर, म्हशीच्या दूधाला प्रतिलिटर ६० रूपये दर द्यावा; अन्यथा दुग्धविकास मंत्र्यांच्या गाडीवर मुरघास टाकू असा इशारा बागल यांनी दिला. शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करणार, पोलीस बंदोबस्त

संसद भवन परिसरातील घटनेतील आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार

चारही आरोपींना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार

कोर्ट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाला धुळ्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव

अवकाळी पावसामुळं झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या केंद्राचे पथक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आले आहे. धुळ्यात हे पथक मुक्कामासाठी आले असता, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. धुळे जिल्ह्यात पाहणी का नाही, असा जाब त्यांनी विचारला. केंद्रीय पथकाच्या नियोजनातच धुळे जिल्ह्याचा पाहणी दौरा नसल्याची माहिती त्यांनी ठाकरे गटाला दिली.

TMC खासदार डेरेक ओब्रायन निलंबित, गोंधळ घातल्यानं कारवाई

नवी दिल्ली :

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांचं निलंबन

संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन

राज्यसभेत गोंधळ घातला म्हणून कारवाई

आमदार अपात्रता प्रकरणी विधीमंडळाकडून ३ आठवड्यांचा वेळ मागणार

आमदार अपात्रता प्रकरणात २ लाख पानांचे दस्तावेज तयार

३४ याचिकांचे सहा गटांमध्ये वर्गीकरण केल्यामुळे विविध ६ निकाल लागणार

विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणीची प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

२१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत निकालाचे लेखन अशक्य

निकालाचे लेखन करण्यासाठी लागू शकतो अधिक वेळ

एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे विधीमंडळासमोर आव्हान

नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठीही वेळेचा होणार अपव्यय

परिणामी, सहा निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली

विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात ३ आठवड्यांचा वेळ मागणार

आज सर्वोच्च न्यायालयात विधीमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता

संसद घुसखोरी प्रकरण : अमोल शिंदेला अॅड. असीम सरोदे करणार कायदेशीर मदत

संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपी अमोल शिंदे याला अॅड. असीम सरोदे करणार कायदेशीर मदत

तरुणांनी केलेल्या कृत्याचा नोंदवला निषेध

नाराज विद्यार्थी संसदेत घुसले. हे युवक बेरोजगारीचा मुद्दा सांगू इच्छित होते.

लोकशाहीत असे कृत्य करणे चुकीचे. सकारात्मक शिक्षा दिली पाहिजे, सरोदेंचे मत

Onion Price : कांद्याच्या दरात घसरण सुरूच, नांदगावला शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

कांद्याच्या दरात घसरण सुरूच..

नाशिकच्या नांदगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद

नांदगाव - येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

दुतर्फा वाहतूक ठप्प

कांद्याला सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव

नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोर मांडला ठिय्या

लिलावात ५०० रुपयांपासून बोली सुरू, तर जास्तीत जास्त १७०० रुपयांपर्यंत भाव

संसदेतील घुसखोरीच्या घटनेनंतर सर्वात मोठी कारवाई, ८ कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

घुसखोरीच्या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आली. या प्रकरणी लोकसभा सचिवालयानं सर्वात मोठी कारवाई केली आहे. संसदेतील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणी पोलीस तपासात आणखी मोठे खुलासे

नाशिक:

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलिसांच्या तपासात आणखी नवे खुलासे

नाशिकच्या शिंदे गावातील कारखान्यात महिन्यातून ७ ते ८ दिवस चालायचे ड्रग्स बनवण्याचे काम

त्यानंतर कारखाना स्वच्छ करून २० ते २५ दिवस काम असायचे बंद

कारखाना बंद असताना केली जायची ड्रग्सची विक्री

ड्रग्स तयार करताना भूषण पाटील, अभिषेक बलकवडे आणि जिशान शेख थांबायचे कारखान्यात

सुरुवातीला मुंबईला पाठवलेलं ड्रग्स रीजेक्ट झाल्याचीही माहिती तपासात समोर

महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक

महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी सात वाजता विधानभवनात ही बैठक होईल.

या बैठकीत सध्याच्या सुरू असणाऱ्या सर्व राजकीय घडामोडी आणि महायुतीमधील इतर मुद्यांवर चर्चा होणार आहे.

२२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेपासून आपण काय शिकलो? ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींचा सवाल

संसदेतील घटनेवरून उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सुरक्षेत झालेली चूक अत्यंत गंभीर आहे. गृहमंत्री अमित शहांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे. २२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेपासून आपण काय धडा घेतला, असा सवाल चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय.

Parliament Security Breach : संसदेतील घटनेबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रपतींना भेटणार

नवी दिल्ली :

संसदेत काल घडलेल्या घटनेबाबत इंडिया (INDIA) आघाडीतील नेते राष्ट्रपतींना भेटणार

इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू

या बैठकीनंतर राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागणार

सभागृहातील घटनेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी करणार

Breaking News Live Updates: लोकसभेसाठी शिंदे गटाने कंबर कसली; ठाण्यात महत्वाची बैठक

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. मीरा भाईदर, नवी मुंबई पाठोपाठ काल ठाण्यातही शिंदे गटाच्या विभागप्रमुख आणि नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत ठाणे लोकसभेत बुथवाईज मतदान कसं वाढेल यावर चर्चा करण्यात आली आहे.

ठाण्यात लोकसभा निवडणुकीची जागा आपल्याच वाट्याला यावी यासाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. अशातच शिवसेनेनं प्रत्यक्ष तयारी सुरू केल्याने जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे.

Breaking News Live Updates: संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात कामबंद आंदोलन; 800 हून अधिक नर्सेस संपात सहभागी

राज्य कर्मचारी आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये 800 हून अधिक नर्सेस सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णसेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच 800 हून अधिक नर्सेस एकत्र येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे.

Breaking News Live Updates: जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आजही मराठा आरक्षणावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचारी सुद्धा जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झाले असून संपाचे हत्यार उपसलं आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. या संपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घडामोडींचा प्रत्येक लाईव्ह अपडेट्स साम टीव्हीवर....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT