team india 1 
बातम्या

WTC Final: सामना जर अनिर्णित राहिला तर काय? ICC नं दिलं उत्तर

अक्षय कस्पटे

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पुढील महिन्यात पहिला जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याबद्दल बरीच चर्चा झाली होती आणि असेही म्हटले जात होते की विजयी संघ निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असावी.  असेही म्हटले जात होते की जर हा विश्व अजिंक्यपद अंतिम सामना अनिर्णित राहिला तर नक्की विजय कोणाचा होणार. (What if the WTC final is a draw? The ICC has responded)

कारण कसोटी क्रिकेटमध्ये बहुतेक सामने ड्रॉ होण्याची शक्यता असते. मात्र, जर हा अंतिम सामना अनिर्णीत राहिला तर काय होईल हे आयसीसीने स्पष्ट केले आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून साऊथहॅम्पटन (South Hampton) हॅम्पशायर बाउल  येथे होणार आहे.

हे देखील पाहा

जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होईल असा प्रश्न चाहते विचारात होते.  परंतु, जून 2018 मध्ये निर्णय घेण्यात आला की जर विश्व अजिंक्यपद सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाईल. आयसीसीने आज पुढील महिन्यात खेळल्या जाणार्‍या अंतिम सामन्याचे नियम व अटी जाहीर केल्या आहेत.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, जर अजिंक्यपद सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाना विजयी घोषित केले जाईल. त्याचबरोबर, नियमित पाच दिवसाच्या खेळादरम्यान जर वेळ गेला असेल तर त्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. हे दोन निर्णय जून 2018 मध्येच घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

SCROLL FOR NEXT