KIdnapping 
बातम्या

धक्कादायक- तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला वेश्याव्यवसायात लोटण्याचा प्रयत्न

चेतन इंगळे

वसई/विरार : नालासोपारा वालीव पोलीस Police ठाण्याच्या हद्दीत एक मुलीचे अपहरण Kidnapping करून तिच्या कडून जबरदस्ती  वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.Thirteen Year old girl kidnapped and forced for Prostitution

मुलीच्या वडिलांनी मुलीचा शोध घेत तिची एका दाम्पत्याच्या घरातून बाथरूम मधून सुटका केली आहे. मुलीच्या वडिलांनी ८ दिवसापूर्वी वालीव पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची Kidnapping तक्रार नोंदवली होती. 

नालासोपारा Nalasopara पेल्हार येथील रिहान चाळ वनोटा पाडा शिवाजी नगर मध्ये राहणारी एक १३ वर्षीय मुलगी अचानक गायब झाली. तिच्या पालकांनी आणि शेजाऱ्यांनी तिचा परिसरात खूप शोध घेतला. पण ती कुठेच आढळून आली नाही. दरम्यान याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडे वडिलांनी चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वडिलांचा संशय बळकावला आणि शुक्रवारी सायंकाळी त्यांनी काही शेजाऱ्यांना घेऊन तिच्या घरात चौकशी केली असता मुलीला बाथरूम मध्ये कोंडून ठेवल्याचे समोर आले.Thirteen Year old girl kidnapped and forced for Prostitution

या मुली सोबत चार जणांनी वेळोवेळी अत्याचार केला असून मुलीला रोज मारहाण करत बाथरूम मघ्ये कोंडून ठेवले जात असल्याचे या मुलीच्या वडिलांनी सांगितले. या प्रकरणी वडिलांनी वालीव पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणी साठी पाठवले आहे. या संदर्भात पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT