The prostitution business was in an upscale neighborhood in Akola
The prostitution business was in an upscale neighborhood in Akola 
बातम्या

अकोल्यात उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय !

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

अकोला : अकोल्यातील Akola उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेल्या वेश्‍या व्यवसायावर  Prostitution business पोलिसांनी छापेमारी करत आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या Ramdaspeth Police Station हद्दीत येणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांमुळे Police उघडकीस आला. The prostitution business was in an upscale neighborhood in Akola

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जठारपेठ परिसरातील सातव चौकापुढे असलेल्या प्रसाद कॉलनी येथील ओंकार अपार्टमेंटमध्ये मुली आणि महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. रामदासपेठ पोलिसांना याबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात येथे  छापा टाकत कारवाई केली. 

हे देखील पहा -

यावेळी पोलिसांनी महिला पंचा समक्ष पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सातव चौकातील ओंकार अर्पाटमेंट एका फ्लॅट मध्ये छापा Raid टाकला. तेथे दोन युवक एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. यावेळी ऋषीकेश संजय मालोकार रा. अंबिकापूर व अनंत नागोराव गांवडे (रा. दापुरा) हे महिलेसोबत आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी आक्षेपार्ह वस्तू तसेच एक ॲक्टिवा स्कुटर व तीन मोबाईल फोन असा एकूण ६७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. The prostitution business was in an upscale neighborhood in Akola

रामदासपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले दोन युवक व महिलेकडे पोलिसांनी विचारणा केली असता वेश्या व्यवसायाचे तार अमरावती जिल्ह्यापर्यंत जुळले असल्याची माहिती मिळाली. अमरावती Amravati जिल्ह्यातील रुस्तमपूर येथील आरोपी विकी विजय कवळे नामक व्यक्ति पैशाचे अमिष दाखवून माहिला आणि तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलीस तपासांत समोर आले. ग्राहकांना आवश्यकते नुसार पैशाचे मोबदल्यात महीला व तुरुणींचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले. ही कारवाई रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पीएसआय पूजा महाजन यांनी केली. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT