बातम्या

पुण्याचा तरुण ठरला, जगातली सर्वोत्तम आई!

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातला एक तरुण जगातील सर्वोत्तम आई ठरलाय. तरुण सर्वोत्तम आई कसा ठरेल? असा प्रश्न तुमच्यापुढं पडला असले, काही तरी चुकलं असेल, असं वाटेलही तुम्हाला पण, हे खरं आहे. एक तरुण सर्वोत्तम आई ठरलाय. त्या तरुणाचं नाव आदित्य तिवारी आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तान आदित्यचा सन्मान करण्यात आलाय. एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं एनडीटीव्हीनं याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे.

काय आहे आदित्य अवनिशची गोष्ट?
आदित्य हा सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करतो आहे आणि त्यानं अवनिश नावाच्या मुलाला दत्तक घेतलंय. अवनिश आहे, स्पेशल चाईल्ड अर्थात गतीमंद आहे. आदित्य त्याचा सिंगर पॅरेंट आहे. आदित्य अविवाहित असून, तो अवनिशची उत्तम देखभाल करतो. आदित्यच्या या निर्णयाची दखल, संयुक्त राष्ट्रांकडूनही घेण्यात आली होती. आदित्य सध्या गतीमंद मुलांच्या पालकांना त्यांच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्याचं कामही करतो. त्यामुळं संयुक्त राष्ट्रांकडून त्याला एका परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. अवनिशसोबतच्या नात्याबाबत आदित्य म्हणाला, 'मला तब्बल सहा महिन्यांच्या संघर्षानंतर 1 जानेवारी 2016 रोजी अवनिशची जबाबदारी मिळाली. त्यानंतर आमच्या दोघांचा आव्हानात्मक प्रवास सुरू झाला. अवनिश हे मला परमेश्वराकडून मिळालेले सर्वोत्तम गिफ्ट आहे. मी स्वतःला कधीच एक उत्तम बाप किंवा आई बनवण्याचा प्रयत्न केला नाही. मी केवळ चांगला पालक आणि एक माणूस होण्याचा प्रयत्न केला.'

Web Title Pune Based Engineer Got Best Mother In The World Award

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

SCROLL FOR NEXT