बातम्या

भारतात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी विमानाचे अवशेष सापडले

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या लढाऊ एफ 16 या विमानाचे अवशेष आज (गुरुवार) पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक विमान पाडले होते. पाकिस्तानचे सैन्य या विमानाचे सांगाडे उचलून नेताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. या लढाऊ विमानांना भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देत पिटाळून लावले. यावेळी भारतीय वायुसेनेला तीन विमानांपैकी एक विमान पाडण्यात यश आले होते. पाडण्यात आलेले पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान होते. 

या विमानाचे अवशेष आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत. यासंबधीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहेत. यामध्ये पाकिस्ताचे अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी अवशेषांची पाहणी करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी हे अवशेष उचलून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे विमान पाडल्याचे हे यातून स्पष्ट होते.

Web Title: Wreckage of Pakistans F-16 shot down by Indian Air Force MiG 21 found in POK

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये बसचा टायर फुटून भीषण अपघात; 5 ते ६ जण दगावल्याची शक्यता

Kolhapur News : अज्ञातांकडून मिरचीवर तणनाशक फवारणी; दीड एकर मिरचीचे नुकसान

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी आज BCCI ची बैठक! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी

Asafoetida water Benefits: गरम पाण्यात हिंग टाकून प्या, होतील गुणकारी फायदे

Buldana Water Storage : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT