Buldana Water Storage : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा

Buldana Water Crisis : तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील जलाशयात पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशयात फक्त 11. 62% जलसाठा उरलाय.
Buldana Water Storage
Buldana Water Storage Saam TV

संजय जाधव

यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसल्याने जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा आधीच कमी झाला होता. त्यातच तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील जलाशयात पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशयात फक्त 11. 62% जलसाठा उरलाय.

Buldana Water Storage
Water Supply : मुंबईतील 'या' शहरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद; जलवाहिनी बदलण्याच्या कामाला वेग

त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. अजूनही पावसाळ्याला दीड महिना बाकी असल्याने आगामी काळात जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 169 गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

बुलढाण्यामध्ये खडकपूर्णा, पेण टाकळी आणि नळगंगा असे तीन मोठे प्रकल्प आहेत. या तिन्ही प्रकल्पातून जवळपास 65 टक्के पाणीपुरवठा जिल्ह्याला केला जातो. सध्या या तिन्ही प्रकल्पात सरासरी 14.3% पाणीसाठा आहे आणि त्यामुळे आगामी काळात आणखी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा 7 ते 8 टक्क्यांवर; 134 प्रकल्प पडले कोरडे

मराठवाड्यामध्ये देखील भीषण पाणीटंचाई दिसत आहे. 749 लघु आणि 75 मध्यम प्रकल्प मिळून 824 प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा आता सात ते आठ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पा पैकी माजलगाव आणि सीना कोळेगाव या 2 प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही राहिला नाही. तर जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा हा 10 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येथेही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

Buldana Water Storage
Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळाच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com