बातम्या

राज्यात सहा हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू; 11 लाख जनावरे छावण्यांत

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली.

संपूर्ण देशभरातच यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. राज्यभरात अनेक धरणे कोरडी पडल्याने गावे आणि वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

राज्यात सर्वाधिक टॅंकर औरंगाबाद, बीड आणि नगर जिल्ह्यात सुरू आहेत. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत टॅंकर सुरू करण्याची आवश्‍यकता नसल्याचे सांगण्यात आले. जनावरांच्या सर्वाधिक चारा छावण्याही बीड, औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यात सुरू असून जनावरांची तेथील संख्या लक्षणीय आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ९५ हजार ५२१ जनावरे चारा छावण्यात आश्रयाला आहेत.

राज्यातील स्थिती (ठळक जिल्हे)
जिल्हा    टॅंकर    एकूण जनावरे 
नाशिक    ३६२    ४५८६
नगर     ८२७    ३,३६,२०३
पुणे     २६९    ११,८१९, 
सातारा    २७१    ५५,०३२,
सांगली    १९९    १८,१९३,
सोलापूर    ३३५    १,५४,६७८,
औरंगाबाद     ११४६    ३०,३९३, 
जालना    ६८२    २३,०६९, 
बीड     ९४०    ३,९५,५२१,
उस्मानाबाद     २०६     ७२,०२१


Web Title: Six thousand tankers in the state and 11 lakh cattle camps

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT