बातम्या

सहानुभूती दर्शवण्यापेक्षा कृतिशील सांत्वन ठरलं आदर्श  

सकाळ न्यूज नेटवर्क

केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी, बांधांच्या खडसणीची कामे करायची कशी? अशा समस्येत पाडळे कुटुंबीय असताना, वाळंजवाडीच्या ग्रामस्थांनी शब्दांची सहानुभूती दर्शवण्यापेक्षा दिलेले कृतिशील सांत्वन अनुकरणीयतेचा आदर्श ठरली आहे.

पावसाळा तोंडावर असताना भात लागवडीसाठी तरवे भरणे आवश्‍यक होते. हे तरवे जर भरले नसते तर पाडळे यांची सर्व जमीन यावर्षी तशीच पडून राहिली असती. हे लक्षात आल्यावर पाडळे कुटुंबाला आधार देण्यासाठी वाळंजवाडी ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. त्यात ग्रामस्थांनी पाडळे कुटुंबाला श्रमदानातून मदत व्हावी म्हणून त्यांच्या शेतात दिवसभर काम करण्याचा निर्णय घेतला. 

ठरल्याप्रमाणे सकाळी संपूर्ण गाव जमा झाला आणि पाडळे यांच्या शेतातील भडसा, बांध तरवे भरणे आदी अनेक कामे ग्रामस्थ, महिला, युवकांनी मिळून केली. खऱ्या अर्थाने वाळंजवाडीतील ग्रामस्थांची ही एकीची भावना कौतुकास्पद व प्रशंसनीय मानावी लागेल. 

आजकाल कुणालाही मदत करताना विचार करणारी माणसे अनेकवेळा आढळतात. मात्र, गावातील अडचणीत सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी अख्खा गाव आपली हातातील कामे बाजूला ठेवून जर एक होवून त्या कुटुंबाला आधार देत असेल, तर वाळंजवाडीतील ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीचे हे अनोखे उदाहरण आजच्या समाजापुढचा नवा आदर्शच आहे. 
पाडळे कुटुंबीयांप्रती वाळंजवाडी ग्रामस्थांनी दाखवलेली ही मदतीची भावना पाहून माणुसकीचा गहिवरच दाटला. विविध शासकीय योजनांमध्ये आपल्या एकीतून गावाचा विकास करणाऱ्या वाळंजवाडीतील ग्रामस्थांच्या या उपक्रमाचा आदर्श इतर गावांनी घेतल्यास महात्मा गांधींच्या स्वप्नातील समृद्ध खेड्यांचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Agriculture Farmer Help Valanjwadi Success Motivation Initiative

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

kitchen Tip: सुक खोबर वर्षभर साठवण्याची जाणून घ्या 'ही' असरदार पद्धत

कपिल शर्माच्या The Great Indian Kapil Show ने दीड महिन्यातच बोजा बिस्तारा गुंडाळला, समोर आलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT