ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणत्याही पद्धतीचे जेवण बनवताना हमखास खोबऱ्याचा वापर केला जातो.
अनेकदा आपण घरात जास्त प्रमाणात सुके खोबरे आणतो.मात्र त्याची साठवण कशी करावी ते समजत नाही.
चुकीच्या पद्धतीने खोबऱ्याची साठवणूक केल्यास ते काळे तसेच चवीला खवट लागते.
पहिल्यांदा खोबरे एका पिशवीत बांधून एका टाईट बंद होणाऱ्या डब्यात ठेवा.
डब्यात खोबरे ठेवण्याआधी मिठाच्या पाण्याने एक कपड्याच्या साहाय्याने खोबऱ्याची वाटी आतून पुसून घ्या.
खोबरे पुसून झाल्यानंतर कडक उन्हात वाळत घाला.
खोबरे खराब होऊ नये म्हणून तुम्ही खोबऱ्याला आतल्या बाजूने खोबरेल तेल लावू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.