बातम्या

दक्षिण दरवाजात उमललं कमळ.. कॉंग्रेसचं नेतृत्व कर्नाटकला अमान्य!

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून प्रतिष्ठेची बनविलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य हिसकावून घेतले. भाजपने 114 जागांवर आघाडी मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालातून कर्नाटकमध्ये मोदी लाट टिकून असल्याचे स्पष्ट झाले. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असेल असे चित्र होते. पण, भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वांनाच मागे टाकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. 

कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली. मात्र, नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले. जेडीएसची भूमिका महत्त्वाची असेल असे वाटत असतानाच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झाले. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी यापूर्वीच आमचेच सरकार स्थापन होईल असा दावा केला होता. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजप 114, काँग्रेस 62, आणि जेडीएस आणि इतर 44 जागांवर आघाडीवर आहेत.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी 70 टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढत होती. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक होता. किनारपट्टीच्या भागात भाजपने पूर्णयपणे वर्चस्व मिळविल्याचे पहायला मिळत आहे. तर, कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या असलेल्या लिंगायत समाजाची मते भाजपलाच गेली असल्याचे पहायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एका ठिकाणाहून आघाडीवर आणि एका ठिकाणी पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव; भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, काय आहे प्रकरण?

Today's Marathi News Live : अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

SCROLL FOR NEXT