Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव; भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, काय आहे प्रकरण?

Karnataka Congress Complaint Agaisnt BJP: कर्नाटक काँग्रेसने भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपने सोशल मीडियावर पोस्ट करून अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांना मतदान न करण्यासाठी धमकावले होते.
Karnataka Politics
Karnataka PoliticsYandex

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

कर्नाटक काँग्रेसने (Karnataka Congress) भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपने सोशल मीडियावर पोस्ट करून अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांना मतदान न करण्यासाठी धमकावले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या अॅनिमेशनचा वापर केला होता. यामुळे कर्नाटकमधील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहेत.

या प्रकरणामुळे कर्नाटक काँग्रेसने निवडणूक आयोगात (Election Commission) धाव घेतली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप कर्नाटकने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरून अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांना मतदान न करण्यासाठी धमकावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजप कर्नाटकने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जाहिरात करताना राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अॅनिमेटेड वापर केल्याची तक्रार करण्यात आली (Karnataka Congress Complaint Agaisnt BJP) आहे. भाजपच्या या व्हिडिओमुळे एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी पक्ष एकमेकांना कमी दाखविण्यासाठी अशा प्रकारच्या पोस्ट किंवा टीका टिप्पणी करत असतात.

Karnataka Politics
Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

१७ सेकंदाचा हा व्हिडिओ बीजेपी कर्नाटक या X अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे आता कर्नाटकमधील वातावरण तापलं आहे. भाजपने थेट कॉंग्रेसवर निशाणा साधल्याचं या व्हिडिओमधून दिसत (Karnataka Politics) आहे. याविरोधात कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे धावत घेतली आहे. त्यांनी भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने याप्रकरणी सांगितलं की, सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karnataka Politics
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com