Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Pune Crime News: अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुकानातील कामगारानेच हा चोरीचा कट रचल्याचे समोर आले आहे.
Pune Crime:
Pune Crime:Saam TV

सागर आव्हाड, पुणे|ता. ५ मे २०२४

हॉलमार्क करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानातून आलेले 13 लाख 49 हजार रुपयांचे 21 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक पुण्यात प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फरासखाना अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुकानातील कामगारानेच हा चोरीचा कट रचल्याचे समोर आले आहे.

याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे शहरात न्यू त्रिशूल हॉलमार्किंग सेंटरचे दुकान आहे. याच दुकानामध्ये आरोपी लकी मोहीते हा कामाला आहे. आरोपीने याच दुकानात यापूर्वी काम करणाऱ्या सचिन दडस व विशाल गोसावी यांच्याशी संगनमत करुन दुकानात चोरी करण्याचा प्लॅन केला. आरोपींनी त्यांचे इतर मित्र अतुल क्षीरसागर व सुरज महाजन यांच्या मदतीने फिर्यादी यांच्या दुकानातून हॉलमार्कसाठी आलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले.

हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास केला असता आरोपी माळशिरस भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माळशिरस भागात आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करुन बारा तासात गुन्हा उघडकीस आणला.

Pune Crime:
MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

लकी दत्तात्रय मोहीते (वय-19 रा. रेताळ वेश चौक, वांगी, सांगली), सचिन मोहन दडस (वय-24 रा. मु.पो. उबरगाव ता. आटपाडी, जि. सांगली), विशाल भागवत गोसावी (वय-21 रा. मु.पो. सराटी ता. इंदापुर), अतुल दत्तात्रय क्षीरसागर (वय-29 रा. माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सुरज भगवान महाजन (वय-27 रा. संग्रामनगर, ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सुलभा सुरेश माने (वय-48 रा. शनिवार पेठ पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime:
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com