बातम्या

SHOCKING | पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालते म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न

साम टीव्ही न्यूज

पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते म्हणून पतीने पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पोलिसांनी पती सुधीर जाधव याला अटक केली आहे.

डोंबिवली नजीक कोपर परिसरातील राहणाऱ्या सुधीर जाधव यांची पत्नी सुजाता जाधव या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. दोघे नवराबायको कामाला आहेत. मात्र पत्नी सुजाता जिन्स आणि टीशर्ट घालते याला पती सुधीर याचा विरोध होता. त्याने या गोष्टीवर तिला वारंवार हटकले होते. त्यामुळे त्यांच्या याच कारणास्तव वाद होत होते. सुजाता मंगळवारी रात्री कामावरुन घरी परत आली. कपडय़ावरुन परत पती पत्नीमध्ये झाला. हा वाद विकोपाला गेला. सुधीर याने रागाच्या भरात पत्नी सुजाताचा गळा आवळुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नी सुजाता बेशुद्ध पडली. ती मयत झाल्याचे समजून सुधीर रामनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी सुजाता हिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचास सुरु आहे.

Web Title - Husband tries to kill his wife bcz she wear a jense and t shirt

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT