बातम्या

महाराष्ट्रातील शिक्षण विभागात येणार दिल्ली पॅटर्न...

सकाळ न्यूज नेटवर्क

 शिक्षण क्षेत्रात दिल्लीने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती नेमक्‍या कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत सविस्तर चर्चा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांनी राज्याच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ही चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागातही दिल्ली पॅटर्न येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने संचालक दिनकर पाटील यांच्या पुढाकारातून व्हीसीच्या माध्यमातून दररोज शैक्षणिक विषयावर चर्चा सुरू आहे. त्यात गुरुवारी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांशी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 880 जणांनी सहभाग घेतला होता.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेतूनन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरातून व शून्य रुपये खर्चातून ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले जात आहे.

गुरुवारी झालेल्या चर्चासत्रात दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया, दिल्लीचे शिक्षण संचालक बिनय भूषण, दिल्लीच्या शिक्षण विभागाचे सल्लागार शैलेंद्र शर्मा सहभागी झाले होते.

दिल्लीच्या शैक्षणिक प्रयोगासंदर्भात सिसोदिया यांनी शिक्षण व्यवस्थेत लक्ष देताना पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, पालक सहभाग, अभ्यासक्रम पुनर्रचना यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. दिल्लीत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एकूण अर्थसंकल्पापैकी 25 टक्के म्हणजे एक चतुर्थांश निधी खर्च केला आहे. शिक्षक प्रशिक्षणामध्ये इंटरॅक्‍टिव्ह ट्रेनिंग, सिस्टिमॅटिक इव्हॅल्युएशन या माध्यमातून काम केले. पालक सहभागामध्ये शालेय व्यवस्थापन समित्या सक्षम करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने मूलभूत वाचन, लेखन व गणित क्रियांसाठी मिशन बुनियाद व हॅप्पीनेस करिक्‍युलम यासारखे बदल केले आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण हिंदीतूनच दिले जात असल्याचेही सिसोदिया यांनी त्या चर्चेत सांगितले.

चर्चेदरम्यान सिसोदिया यांना दिल्लीतील शैक्षणिक प्रयोगाबद्दल अधिकाऱ्यांनी प्रश्‍न विचारले. त्याला योग्य ती उत्तरेही देण्यात आली. सिसोदिया यांनी आम्हाला पण महाराष्ट्राकडून त्यांचे प्रयोग ऐकायला आवडतील असे मत व्यक्त केले. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यात सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल माहिती दिली. या चर्चेत शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी काही प्रश्‍न विचारून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 
चर्चासत्राच्या समारोपावेळी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात काय सकारात्मक बदल करू शकतो, यापासून सुरवात करण्याचे आवाहन संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाशी लग्न, नंतर दुसऱ्यासोबत संसारासाठी निघून गेले; शिंदे गटाच्या खासदाराची सणसणीत टीका

लक्ष्मण हाकेंच्या लग्नाच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक; जिथे दिसेल तिथे ठोकू, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा इशारा

Sunday Horoscope : कन्या राशीच्या संपत्तीत होणार वाढ तर मकर सोबत होणार विश्वासघात, पहा तुमच्या राशीत काय लिहिलेय!

Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून तरुणाचं अपहरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Face Care: बेसन की हळद? जाणून घ्या कोणत्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर येईल इंस्टंट ग्लो

SCROLL FOR NEXT