बातम्या

मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक

सकाळ न्यूज नेटवर्क

मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी सकाळी मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला. यापूर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला. पोलिसांनी मिलिंद एकबोटेंविरोधात तीन गुन्हे नोंदवले असून त्यात ऍट्रॉसिटी गुन्ह्याचाही समावेश आहे. पुणे सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. पण उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ​दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यात हालवले

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये Dining Table कुठे असावा? जाणून घ्या

Benifits of Jaljeera: रोज एक ग्लास जलजीरा पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Weightloss Recipe: डायटींग करताना सोपी आणि हेल्दी चाट रेसिपी करा ट्राय

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT