Heavy rains in Pusad taluka of Yavatmal district
Heavy rains in Pusad taluka of Yavatmal district 
बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ : येथे सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. कालपासूनच यवतमाळ येथे ढगाळ वातावरण आहे . पुसद तालुक्यात आज पावसाने तुफानी बॅटिंग केली. ढगफुटीसारखा या तालुक्यात पाऊस झाला त्यामळे शेतकऱ्यांची मात्र पुरती दाणादाण उडाली. तालुक्यात पडलेल्या पावसाने पडला पारडी येथील नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे पारडी ते जांब बाजार रोड हा तब्बल एक तास बंद होता. तर पुसद दिग्रस रोड वरील वाहतुकीकरिता तात्पुरता बांधण्यात आलेला छोटा कच्चा पूल पाण्याने वाहून गेला.(Heavy rains in Pusad taluka of Yavatmal district)

त्यामुळे पुसद दिग्रस रोडवरील वाहतूक खोळंबली होती. पाणी ओसरल्यावर लगेच या या पुलावर भर टाकून वाहतुकीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पुसद तालुक्यातील भोजला, शेलु खुर्द, रंभा, पिंपळगाव परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामुळे शेताचे बांध फुटून शेकडो हेक्टर वरील जमीन खरडून गेली . यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी पिकांचे आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

  हे देखील पाहा 

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये यंदाच्या पावसाला लवकरच सुरुवात झाली. राज्यात ठीक-ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. साला बादप्रमाणे मुंबईतील काही भागात पाणी साचले आहे. काही मार्गांवरील लोकल देखील बंद आहे. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागात अंगावर पडून अनेक शेतकरी तसेच सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाला आहे.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT