बातम्या

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क

निघोज (नगर) : गुणोरे (ता. पारनेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने आज पत्नी व दोन अल्पवयीन मुलांसह गळफास घेऊन पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. पत्नी व मोठ्या मुलाचे सततचे आजारपण व त्यातून निर्माण झालेल्या अर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ भयचकीत झाले असून, बढे यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली आहे.

बाबाजी विठ्ठल बढे (वय 35), त्यांची पत्नी कविता (वय 34), मोठा मुलगा आदित्य (वय 16) व लहान मुलगा धनंजय (वय 14) अशी यातील मयत चौघांची नावे आहेत. बढे यांची चुलत बहिण रेखा सुभाष गागरे आज सकाळी दूध आणण्यासाठी बढे यांच्या घरी गेली होती. त्या वेळी त्यांना बढे यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. रेखा हीने याची माहिती पती सुभाष गागरे यांना दिली. सुभाष यांनी घटनास्थळी पोचून बढे यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गागरे यांनी बढे यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले. समोरचे दृश्‍य पाहून गागरे भयचकीत झाले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना व ग्रामस्थांचा घटनेची कल्पना दिली. ग्रामस्थांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस पथकही तातडीने दाखल झाले आहे. त्याचा पंचनामा सुरु आहे.

तरुण शेतकरी बाबाजी यांची पत्नी कविता गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांचा मोठा मुलगा आदित्य अपंग होता. तो देखील आजारी असल्याने घरीच असायचा. त्यात घरची आर्थिक स्थितीही हालाखीची होत गेली. बाबाजी यांच्याकडे चार गायी आहेत. त्यावरच बढे कुटुंबाची गुजराण होती. शेतीमध्येही सारखी दुष्काळी स्थिती असल्याने फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यातच बाजारभाव मिळत नसल्याने अर्थिक स्थिती कमकुवत होत गेली. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार झाल्याने बाबाजी यांची पत्नी कविता या बाजूच्या महिलांशी नेहमी मरणाच्या विषयावर चर्चा करायची, असे समजते.

दरम्यान, या घटनेत बाबाजी यांनी अगोदर पत्नी व दोन मुलांना गळफास दिला. त्यानंतर स्वत: गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.


Web Title: four members from farmer family commits suicide in Parner Nagar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT