cm uddhav
cm uddhav 
बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना आणि गंभीर जखमींना मदत जाहीर 

साम टिव्ही ब्युरो

नाशिकमध्ये Nashik आॅक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पहाटे विरार Virar येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागाला आग Fire लागून त्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. CM Uddhav Thackeary  announces help for virar-hospital-fire-victims 

विरार पश्चिम येथे हे कोविड Covid 19 रुग्णालय आहे. त्यात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeary यांनी दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत  Help जाहीर केली आहे. विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. CM Uddhav Thackeary  announces help for virar-hospital-fire-victims

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT