The clerk has caught red handed by the bribery department while taking bribe
The clerk has caught red handed by the bribery department while taking bribe 
बातम्या

सांगली जिल्हा परिषदेतील लिपीक अडकला लाचलुचपत जाळ्यात

साम टीव्ही न्यूज .

सांगली :- सांगली Sangali येथील जिल्हा परिषदेतील Jilha Parishad बांधकाम विभागातील लिपीकास पंचवीस हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. अरूण योगीनाथ कुशीरे  असे त्याचे नाव आहे. तर तक्रारदार यांच्या कामाची देयक रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. तर जिल्हा परिषदेतील कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. The clerk has caught red handed by the bribery department while taking bribe

अरूण कुशीरे हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात Construction Department लिपीक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांनी केलेल्या कामाची देयक रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी कुशीरे याने ३५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात या प्रकाराविषयी तक्रार केली.

हे देखील पहा -

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कुशीरे याने २५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी जिल्हा परिषदेत सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांनी पंचवीस हजार रूपयांची लाच देताना कुशीरे यास रंगेहात Red Handed पकडण्यात आले. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यात टाळेबंदी Lockdown असतानाही लाचखोरीचे प्रमाण वाढलेलेच आहे. तब्बल तीन मोठ्या कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्या आहे. राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक, कवठेमहांकाळ येथील तलाठी आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेतील लिपीकावर ही कारवाई झाली आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

SCROLL FOR NEXT