Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray 
बातम्या

नवी मुंबईच्या विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण?

साम टीव्ही ब्युरो

नवी मुंबई : नवी मुंबईत निर्माण होत असलेल्या नवी मुंबई Navi Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको CIDCO संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. CIDCO seals proposal to rename Navi Mumbai Airport as Blasaheb Thackeray International Airport

त्यामुळे नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे आता यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी २४ डिसेंबर रोजी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पत्र पाठवून सिडकोद्व्रारे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे नामकरण हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (१) यांच्याकडे पाठविण्यास सांगितले होते.

याशिवाय ४ जानेवारी रोजी राज्याच्या  Maharashtra नगर विकास विभागाने देखील सिडकोला पत्र पाठवून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे International Airport हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करून सदर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ सादर करण्यास सांगितले होते. CIDCO seals proposal to rename Navi Mumbai Airport as Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray International Airport

त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत नवी मुंबईतील विमानतळाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने मंजूर केला आहे. नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाबाबत सिडकोने केलेल्या शिफारसीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मान्यतेसाठी आवश्यकता असल्यास पाठवला जाऊ शकतो. सिडकोच्या या निर्णयाला मात्र प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे.  

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाईंदरमध्ये नाल्यात नवजात मृत अर्भक आढळल्याने खळबळ

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT