बातम्या

कॉ़ग्रेसचं धोरण पवारचं ठरवणार 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई :  भाजप-शिवसेना युतीच्या सत्ता स्थापन करण्यास अद्याप मुहूर्त मिळत नाही. अशा परिस्थितीत कोणतीही राजकीय रणनीती ठरविण्याचे सर्वाधिकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले नाही, तर आघाडीने शिवसेनेच्या पुढाकाराने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली कराव्यात का, याबाबत सोनिया गांधी यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. यावर मतप्रदर्शन करताना सोनिया यांनी राज्यात असा कोणताही राजकीय निर्णय घ्यायचा झाल्यास याबाबत शरद पवार यांचे मत जाणून घ्या. तसेच, त्यांच्या सल्ल्यानेच पुढे जा, असे सांगितले असल्याचे समजते.

भाजप आणि शिवसेना युती करून विधानसभा निवडणूक लढले असून, त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निकाल लागून सहा दिवस झाले, तरीही अद्याप सरकार स्थापन झाले नाही अथवा स्थापन करण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने कोणती भूमिका घ्यावी, याबाबत सोनिया गांधी यांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधला होता.

दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्टीकरण केले असले तरी दोन्ही पक्षांत काहीतरी शिजत असल्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट, गोल्डी ब्रारसह 25 जणांवर आरोप निश्चित

Today's Marathi News Live : अमित शहा बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरण : कोर्टाने कारवाईची याचिका फेटाळली

Pune Railway : रेल्वेत ३५ हजार फुकटे प्रवाशी; एकाच महिन्यात ३ कोटी १२ लाखाचा दंड वसूल

Dark Eyebrows : दाट आणि काळेभोर आयब्रो हवेत? ट्राय करा 'या' सोप्या टिप्स, आकर्षक दिसाल

Pune Crime News : धक्कादायक! आईच्या मित्राची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर; घरी कोणी नसताना केलं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT