Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी; शेतकरी अडचणीत

Yavatmal News : राज्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात भिजला होता. तसेच सोयाबीन काढणीला देखील उशीर झाला होता.

Rajesh Sonwane

संजय राठोड
यवतमाळ
: सोयाबीनची काढणी झाल्यानंतर शेतकरी आता मार्केटमध्ये विक्रीसाठी आणू लागला आहे. दिवाळीमुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. मात्र दरात घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुळात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. 

राज्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात भिजला होता. तसेच सोयाबीन काढणीला देखील उशीर झाला होता. मात्र सोयाबीन काढणी झाल्यानंतर शेतकरी लागलीच विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये आणत आहे. दरम्यान (Yavatmal) यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाफेडने काही ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. पहिल्या दिवशी (Soyabean Price) सोयाबीनचा दाणाही खरेदी न करता सोयाबीनमध्ये ओलावा असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगीत कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहेत.

सोयाबीनला मिळतोय ३ हजाराचा भाव 

अर्थात मार्केटमध्ये सोयाबीनला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा देखील कमी भाव मिळत आहे. सद्यस्थितीत सोयाबीनला हमीभाव पेक्षाही कमी दर मिळत असून तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपये दरात ओलावाचे कारण सांगून खरेदी केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dental infection effects: दातांदुखी अंगावर काढाल तर हार्ट अटॅक येईल; नवीन अभ्यासाचा इशारा, तोंडातील इन्फेक्शन ठरेल जीवघेणं?

Veen Doghantali Hi Tutena : समर-आनंदच्या मैत्रीतील दुरावा मिटेल का? अखेर स्वानंदीनं सर्वांसमोर आणलं खरं सत्य | VIDEO

Healthy Relationship Tips: लग्न ठरलंय? पार्टनरला या गोष्टी विचारल्याशिवाय पुढे जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला

Shakira: शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द; 32 हजाराचं होतं एक तिकीट, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगावमधील मंदिरातील पुजाऱ्याची होणार चौकशी

SCROLL FOR NEXT