Pulses-Wheat Rate Saam Tv
ऍग्रो वन

Pulses-Wheat Rate: महागाईने पिचलेल्या जनतेसाठी गुड न्यूज! डाळ आणि गव्हाच्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारचा प्लान काय?

Wheat and Pulse Inflation : बिगर बासमती तांदळाच्या किमती रोखण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

कोमल दामुद्रे

Pulses-Wheat Update : वाढत्या महागाईमुळे हल्ली प्रत्येकाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भाज्यांच्या वाढते दर, पेट्रोल-डिझेल व डाळी व गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे सगळेच त्रस्त आहेत. अशातच महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

बिगर बासमती तांदळाच्या किमती रोखण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सरकार डाळीं आणि गव्हाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलू शकते. असे देखील सांगण्यात येत आहे.

1. सरकार हे पाऊल उचलू शकते

मनीकंट्रोलवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गहू आणि डाळींच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. वृत्तानुसार, या विषयावर बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून डाळी आणि गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. यासाठी सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. यामध्ये डाळी आणि गव्हाच्या विशिष्ट जातींच्या निर्यातीवर बंदी घालणे, मागणीचा पुरवठा आणि आयात आणि सीमा शुल्कात बदल करणे यासारख्या पायऱ्यांचा समावेश आहे. दरवाढीला लगाम घालण्यासाठी सरकारने यापूर्वीच अनेक पावले उचलली आहेत.

विशेष म्हणजे सरकारने मे 2022 पासून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याच वेळी, डाळींच्या किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार 2023-24 या आर्थिक वर्षात उडीद आणि तूर यांच्यावरील सीमा शुल्क 10 टक्क्यांऐवजी 0 टक्के ठेवू शकते

2. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी

२० जुलै रोजी तांदळाच्या (Rice) निर्यातीवर मोठा निर्णय घेण्यात आला होता. मान्सूनच्या उशीरा येण्याने धान्यांचे नुकसान झाले त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. तसेच यंदा पिकातही घट होण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांनी मत मांडले आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारपेठेत (Market) तांदळाची उपलब्धता निश्चित करण्यासाठी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

3. अन्नधान्य महागाई वाढली

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील डाळींचे दर नियंत्रित करण्यासाठी, पीपीएस योजनेंतर्गत, 2023-24 या आर्थिक वर्षात 40 टक्के डाळींची खरेदी मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यात तूर, उडीद आणि मूग डाळीचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात तूर दरात ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षभरात गव्हाच्या (Wheat) दरात ५.७९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गहू 27.80 रुपये किलो होता, तो आता 29.41 रुपये किलो झाला आहे.

अशा परिस्थितीत गव्हाची निर्यात कमी करण्यासाठी सरकारने गव्हाच्या आयात शुल्कात ४० टक्के वाढ केली होती. गहू, तांदूळ आणि डाळींव्यतिरिक्त देशात दूध आणि भाजीपाल्याची महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत, जून 2023 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर मे महिन्याच्या तुलनेत 2.96 टक्क्यांवरून 4.49 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT