मनोज जयस्वाल
वाशीम : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन काढणीला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. मात्र सोयाबीनच्या दरात अजूनही अपेक्षित दर मिळत नाहीत. इतकेच नाही जुन्या सोयाबीनला देखील भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
वाशिम (Washim) जिल्ह्यात सोयाबीन तोडणी व काढणीची लगबग सुरू आहे. आगामी सण, उत्सवाचे दिवस असल्याने शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. नवे सोयाबीनच नव्हे, तर जुन्या (Soyabean Price) सोयाबीनलाही बाजार समित्यांत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. बाजार समित्यांत नव्या सोयाबीनची खरेदी किमान ३ हजार ६२५ ते ४ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. तर जुन्या सोयाबीनची खरेदी ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भावानेच होत आहे.
बाजार समितीत आवक वाढली
सोयाबीन काढणीला सुरवात झाली असून बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. वाशिम बाजार समितीमध्ये ५ हजार १८० क्विंटल पोत्याची आवक झाली होती. तर कारंजा बाजार समितीमध्ये ६ हजार क्विंटलची आवक होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.