Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop : बदलत्या वातावरणाने कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव; पाने लाल पडून गळती

Washim News : हमी भावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतं असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कपाशी पिकाकडे वळले आहेत

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: यंदा पावसाळा सुरु झाल्यापासून सतत पाऊस सुरु आहे. यंदा पिकांना आवश्यक प्रमाणात ऊन मिळत नसल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर आता देखील ढगाळ वातावरण कायम आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

वाशिम (Washim) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. मात्र मागील दोन- तीन वर्षापासून सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना घट येत असून उत्पादन खर्च अधिक होत आहे. शिवाय हमी भावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतं असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कपाशी पिकाकडे (Cotton Crop) वळले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड केली आहे. 

मात्र, मागील पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण व सततचा पाऊस या बदलत्या वातावरणामुळं कपाशी पीकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलं, पाते गळून जात असून पानं लाल पडतं असल्याने कपाशी पिकं धोक्यात आली आहेत. कपाशीवर हा रोग वाढत असल्याने शेतकऱ्याची (farmer) चिंता वाढली आहे. शिवाय कपाशीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...

Maharashtra Live News Update: जळगवात सोन्याचे दर 3 हजारांनी घसरले, तर चांदीचा भावही घसरला

JEE Mains Result: डोबिंवलीचा लेक राज्यात पहिला, जेईईमध्ये ९९.९९ टक्के मिळवले

Om Chanting: २१ दिवस 'ॐ' म्हटलं तर चमत्कारी बदल होणार; आत्ताच वाचा फायदे

Ajit Pawar Death : अजितदादांना राष्ट्रवादीमधील अनेकांनी त्रास दिला, दिग्गज नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT