Bogus Cotton Seeds Saam tv
ऍग्रो वन

Bogus Cotton Seeds: बोगस कपाशीच्या बियाणे रिपॅकिंग कारखान्यावर धाड; २९६ पोते बियाण्यांसह साहित्य जप्त

बोगस कपाशीच्या बियाणे रिपॅकिंग कारखान्यावर धाड; २९६ पोते बियाण्यांसह साहित्य जप्त

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्‍यास

वर्धा : राज्यात मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरवात केली. अश्यातच कपाशीच्या बोगस बियाण्याच्या (Bogus Seeds) रिपॅकिंग कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी धाड टाकत शेतकऱ्यांची (farmer) होणारी फसवणूक रोखली. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्याच्या (wardha) तक्रारीवरून विविध कलमन्वये पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आठ आरोपीना अटक करण्यात आली आहे (Maharashtra News)

वर्धेच्या म्हसाला परिसरातील एका घरामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांना येथे मोठ्या प्रमाणात बियाणे, विविध कंपनीचे बनावटी बियाने पॅकेट, पॅकिंग मशीन, वजन काटा आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी (Police) सखोल तपास केला असता हे बियाणे गुजरात येथून आणत वर्धेत रिपॅकिंग करून संपूर्ण विदर्भात विकले जातं असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांना घटनास्थळी एक ट्रक भरून बियाणे सुद्धा मिळाले. यानंतर पोलीस महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरवात केली.

दीड कोटीचा मुद्देमाल जप्‍त

रात्रभर चालेल्या या कारवाईत पोलिसांना विविध माहिती प्राप्त झाली. घटनास्‍थळावरून पोलिसांनी ट्रक, चारचाकी वाहन, मोटारसायकल, कपाशीचे सुटे बियाणे, बियाणे भरलेले पॅकेट, पेंटिंग, पॅकिंग आणि सिलिंग मशीन, वजनकटा, रकामे विविध कंपनीचे छापील पॅकेट आणि तीन लाख रुपये रोख, मोबाइल असा एकूण एक कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कापसाचे बोगस बियाणे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील गावातून आणले असल्याची माहिती मिळाली.

मुख्‍य आरोपीला अटक

मागील एक महिन्यापासून हा कारखाना सुरु होता. यांनी आतापर्यंत विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा यासह इतर जिल्ह्यात वेगवेगळ्या कृषी केंद्र मार्फत बियाण्याची विक्री केली. यापूर्वी यांनी १४ टन बोगस बियाण्याची विक्री केली आहे. कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. यातील मुख्य आरोपी हा वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील राजू जयस्वाल याला अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आणि पोलीस विभागाकडून वेगवेगळ्या पथक तयार करण्यात आले आहे. कोणत्या कृषी केंद्रावर विक्री केलीय याचा शोध घेत या रॅकेटचा पर्दाफाश करून सर्वाना अटक करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी दिली.

या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह सेवाग्राम पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी राजू सुभास जयस्वाल (रा. वर्धा), धरमसिंग यादव (रा. जौनपूर, उत्तरप्रदेश), राजकूमार वडमे (रा. रेहकी ता. सुलू जि. वर्धा), हरीष्चंद्र उईके (रा. राडोंगरी जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश), अमन धूर्वे (रा. लास जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश), सुदामा सोमकूवर (रा. लास जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश), गजू बोरकर (रा. सेलू), विजय बोरकर (रा. हमदापूर), प्रविण (रा. वरोरा, चंद्रपूर), वैभव भोंग्र (रा. अमरावती), पंकज जगताप (अमरावती), गजभिये (क्रिस्टल कंपनी नागपूर), गजू ठाकरे (रा. कारला रोड), षूभम बेद (रा. वर्धा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT