Wardha News
Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News: शेतकरीपुत्राने बनविले सुविधायुक्त मचाण; सुरक्षिततेचीही काळजी

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : शेतात पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करत थांबतात. पण ही मचाण पाहिजे तितकी सुरक्षित नसते. शेतकऱ्यांना शेतात (Wardha News) थांबण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या (Farmer) मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केली आहे. त्यात सुरक्षिततेचाही विचार केलाय. (Tajya Batmya)

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे यांच्‍या घरी शेती असल्याने त्यातील अडचणी योगेशच्या परिचयाच्या होत्‍या. काही दिवसांपुर्वी रात्री शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला बिबट्याने फरफटत नेल्याची वार्ता योगेशने ऐकली होती. तिथून योगेशची तगमग सुरू झाली. शेतात काम करताना शेतकऱ्यांचा वन्यजीव आणि पाऊस, वीज यापासून बचाव व्हावा यासाठी योगेशने कल्पकतेने मचाण तयार केले. हे मचाण शेतकऱ्यांसाठी नक्कीच सोयीच ठरू शकते.

मचाणमध्‍ये या आहेत सुविधा

मचाणची उंची 5 ते 6 फूट उंच आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक लावण्यात आले आहे. वरील भागावर सोलर पॅनल लावलय. सोलरवर ऑपरेटिंगवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास झुलादेखील लावलाय. शेतकरी मचाणची मागणी नोंदवत आहे. त्यांच्या मागणीनुसार मचान देणार असल्याचं योगेशन सांगितलं.

वन्यजीव, नैसर्गिक आपत्तीपासून बचाव

या मचाणमुळे शेतकऱ्यांचा शेतात काम करताना वन्यजीव आणि नैसर्गिक आपत्तीपासून बचाव होणार आहे. हे मचाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे योगेशकडून सांगण्यात आले. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने मचाणविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येत आहेत. मचाणकरीता लोखंडी तसेच आवश्यक साहित्याचा वापर केला आहे. भविष्यात कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं योगेशन सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

Breakfast Recipe: नाश्त्याला बनवा १० मिनीटांत तयार होणारे दडपे पोहे

Benefits of Chana Dal : चण्याची डाळ खा आणि चमत्कारिक फायदे मिळवा; आजच आहारात समावेश करा

Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी गाडी; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT