Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News : कृषी केंद्र संचालकांकडून बियाणांचा कृत्रिम तुटवडा; तात्काळ कारवाई करण्याची मागणी

Wardha News : खरीप हंगाम सुरु झाला असून पाऊस देखील बऱ्यापैकी पडला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: पावसाचे आगमन झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी कृषी केंद्रावरून बियाणे खरेदीसाठी गर्दी करत आहे. अश्यातच जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक बियाण्यांचा कुत्रीम तुटवडा निर्माण करत काळाबाजार केला जात आहे. बियांना होत असलेला काळाबाजार थांबवून कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

खरीप हंगाम सुरु झाला असून पाऊस देखील बऱ्यापैकी पडला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून काळाबाजार करण्यास सुरवात झाली आहे. दुकानात बियाणे असून देखील त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांकडून (Farmer) अधिक रक्कम घेत आहे. बियाणे विक्रीकारिता अनेक एजेंटच्या माध्यमातून काळाबाजार केल जातं आहे. सोबतच बियाणे घेताना शेतकऱ्यांकडून लिंकिंगची जबरदस्ती केली जातं आहे.

मनसेची कृषी कार्यलयावर धडक 

या सर्व मुद्याना घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृषी अधिकारी कार्यालयावर (Agriculture Department) धडक दिली. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT